महाराष्ट्र

On the occasion of Abhishtchintan of Shivajirao Dada raised a thought — H.B.P. Ram Rao Dhok Maharaj शिवाजीरावदादांच्या अभिष्टचिंतन निमित्ताने विचाराचा जागर मांडला — ह.भ.प. रामराव ढोक महाराज

प्रभु श्रीरामचंद्राच्या राज्याभिषेकाने झाला रामकथा ज्ञानयज्ञाचा समारोप
गेवराईमाजीमंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी मिळून रामकथेचा ज्ञानयज्ञ आणि किर्तन महोत्सव आयोजित करुन विचाराचा जागर मांडला. या ऐतिहासिक सोहळ्याला आपली जी उपस्थिती राहिली तीचा दादांना दिर्घ आरोग्यासाठी सदिच्छा राहिल. रामायण कथेपासून आपण उर्जा घेऊन वागले पाहिजे असे प्रतिपादन करत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी सहा दिवस चाललेल्या रामकथेचा समारोप रामराज्याभिषेकाचा प्रसंग उभा करत केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, माजी आमदार अमरसिंह पंडित, जयसिंग पंडित यांच्यासह सर्व संतमहंत, किर्तनकार उपस्थित होते. यावेळी शिवछत्र परिवाराच्या वतीने जयसिंग पंडित यांनी ढोक महाराजांचा सत्कार केला.

माजीमंत्री शिवाजीराव (दादा) पंडित यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रामकथा ज्ञानयज्ञाचा आज समारोप झाला. रावण वध व प्रभु श्री रामचंद्रांच्या रामराज्याभिषेक यावर रामायणाचार्य ह.भ.प.रामराव महाराज ढोक आपल्या अमृततुल्य वाणीतून रामकथा सादर केली. तब्बल ७२ दिवसाचे

 युद्ध….रावण त्वेषाने पेटली वानर सेना…प्रभु रामचंद्राचे आशिर्वादाचे बळ… सागरात उभारलेला सेतू..बिभीषणाची सत्याबरोबर दिलेली साथ.…लक्ष्मणाला लागलेली शक्ती… घनघोर युद्ध…अनेक वानरांचा वध…कुभंकर्ण वध… इंद्रजित वध….अखेर रावणाचा वध….राजा राम राम राम….सिता राम राम राम(मंडपात रामनामाचा गजर)….विजयी रामचंद्राचे अयोध्येत आगमन… बंधुमिलन…. मातामिलन…जयजयकार आणि करुणेचा प्रसंगात प्रभु रामचंद्राचा राज्याभिषेक..आणि कथायज्ञाचा समारोप झाला. शेवटी माजीमंत्री शिवाजीराव पंडित यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पवित्र रामायण ग्रंथाची आरती झाली.

यावेळी मनेश्वर संस्थानचे ह.भ.प. विष्णू महाराज भारती, चिंतेश्वर संस्थानचे ह.भ.प. दिलीप महाराज घोगे, ह.भ.प. तिर्थराज पठाडे महाराज, ह.भ.प. विष्णू महाराज सुरवसे, ह.भ.प. गिन्यानदेव महाराज घरत, शिवचरित्रकार, ह.भ.प. दिपक महाराज बुरुडे, ह.भ.प.डोंगरे महाराज ह.भ.प नाना महाराज कदम, ह.भ.प. दत्ता महाराज गिरी, ह.भ.प. श्रीहरी पवार यांच्यासह भजनी मंडळी, टाळकरी, वादक उपस्थित होते.

शिवाजीराव पंडित अभिष्टचिंतन सोहळा समितीच्या वतीने रामराव ढोक महाराज आणि ईतर संत महंताता सत्कार करण्यात आला. रामकथेचे सुत्रसंचलन माधव चाटे यांनी केले. रामकथेला गेवराई शहर आणि परिसरात भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भक्तीत दंग होऊन नृत्य करणारे गर्जेबाबा ठरले रामकथेचे आकर्षण
माथ्यावर भगवा फेटा..पांढऱ्या शुभ्र दाडीच्या वर कपाळी अष्टगंध टिळा..
गळ्यात कवड्याची माळ, पुष्पहार…हातात डमरु आणि चिपळ्या..पायात घुंगरू बांधुन भक्तीत लीन होऊन संथ लयीत नृत्य करणारे पाटोदा तालुक्यातील महासांगवीचे श्री ज्ञानोबा गर्जेबाबा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. त्यांच्या भक्तीमय डोलणे पाहून उपस्थित भक्तगण मंडळी ही जागीच डोलत होते. एकंदरीत भक्तीरसात सारेच चिंब झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button