आरोग्य व शिक्षण

कोरोना रुग्णांसाठी आली ही गोळी; किंमत फक्त 103 रुपये

नवी दिल्ली

करोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने (Glenmark Pharmaceuticals) औषध बाजारात आणले आहे. या अँटीव्हायरल औषधाचे नाव फेविपिरावीर असे आहे. ‘DCGI’ (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया ) ने या औषधाच्या उत्पादनाला आणि विक्रीला परवानगी दिली असल्याची माहिती कंपनीने दिली. या एका गोळीची किंमत 103 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. 

ग्लेनमार्क फार्मा ही औषध निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. मागील सहा महिन्यांपासून जगभरात करोना व्हायरसवर लस तयार करण्यासाठी संशोधन सुरू आहे. मात्र अद्याप कुणालाही त्यात यश आले नव्हते. अमेरिकेतील काही कंपन्यांकडून वेगाने संशोधन सुरू आहे. पण ग्लेनमार्क फार्मा नं करोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध तयार केले सुरुवातीला या औषधांची 1000 रुग्णावर चाचणी घेण्यात येणार आहे. या एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे. दरम्यान

करोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबीफ्ल्यू ( FabiFlu) या ब्रँड अंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे करोना रोखण्यासाठी पहिल्यांदाच एखाद्या औषधाला सरकारने मान्यता दिली आहे. 

देशात करोना रुग्णसंख्येत वाढ

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आहे. ही भीती जर खरी ठरली तर या गोळीचा आधार खूप मोठा होणार आहे सध्या देशात करोनाचे रुग्ण सुरुवातीच्या तुलनेत वेगाने वाढत आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा दबाव आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून ही मंजुरी मिळाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. फेविपिरावीरच्या उपयोगाने रुग्णांवर प्रभावी उपचार करता येणार आहे, असं ग्लेनमार्कचे अध्यक्ष आणि संचालक ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितलं. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close