आपला जिल्हा

बॅन्केच्या अधिकार्‍यांमुळे दलाल आत अन शेतकरी बाहेर रांगेत उभा

              • जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग — डाॅ. घोडके

गेवराई — तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची व्यवस्था प्रत्यक्ष गावात जावून करावी, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेली असतानाही, बॅन्केने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे, पीक कर्ज उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याची माहिती डाॅ. उद्धव घोडके यांनी दिली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करणाऱ्या मुजोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करून, शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज म्हणजे आपल्या बापाच्या घरातूनदिले जात असल्याचा आव संबंधित बॅन्के कडून आणला जात असल्याचे ही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे.

तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद (आता इंडिया ), महाराष्ट्र ग्रामीण बॅन्क, बॅन्क ऑफ महाराष्ट्र, बॅन्क ऑफ इंडिया च्या एकुण सतरा शाखेत पीक कर्ज वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. तीस जून पर्यंत पीक कर्ज संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर गेले पाहिजे, अशी अपेक्षा आहे.जिल्ह्यातील शेतकर्‍यांना वेळेवर पीक कर्ज वाटपाची व्यवस्था तातडीने व्हावी म्हणून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व बॅन्केच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. कोरोना सारख्या महामारीमुळे सोशल डिस्टंन्सिंग पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे, अधिकार्‍यांनी गावात जावून बैठका घेऊन कर्ज वाटप करावे. बॅन्केच्या अधिकार्‍यांनी केवळ बैठका घेतल्या आहेत. अजूनही अर्ज दाखल केले जात आहेत. जून महिना संपत आला तरी पीक कर्ज वाटपाचे 15% उद्दिष्ट ही अद्याप पूर्ण झालेले दिसत नाही. बॅन्केच्या अधिकार्‍यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केला असून, 

बॅन्केच्या अधिकार्‍यांमुळे दलाल आत अन शेतकरी बाहेर रांगेत उभा असल्याचे चित्र दिसत असल्याने शेतकरी नाराज असल्याचे डाॅ. घोडके यांनी सांगितले आहे.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close