Tempo crushes motorbikes on Beed Bypass; Two killed बीड बायपास वर टेंपोने मोटार सायकलला चिरडले; दोन ठार

बीड — बीड बायपास वरील छत्रपती संभाजी महाराज चौकात भरधाव आयशर टेम्पोने दुचाकीला चिरडले. यात मजूर महिलेसह मिस्त्रीचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली.
बीड शहरातून मांजरसुंबा कडे मोटार सायकल वरून जात असलेल्या. कालिदास विठ्ठल जाधव 38वर्ष,रा. शेलगाव गांजी ता. केजवअनिता भारत सरपते वय 41, रा. गोविंदनगर, धानोरा रोड, बीड यांना गेवराई कडे भरधाल वेगाने जात असलेल्या आयशर टेम्पो क्र. एमएच 15 एव्ही – 1847 ने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत मोटार सायकल वरील अनिता सरपती व कालिदास जाधव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. कालिदास जाधव हे बांधकाम मिस्त्री होते तर अनिता सरपते या बिगारी मजूर म्हणून काम करत होत्या. या अपघातात मोटार सायकल टेम्पो खाली आली व अनिता सरपटे यांचा मृतदेह टेम्पो खाली अडकला दरम्यान क्रेनच्या साह्याने तो बाहेर काढण्यात आला. दुर्घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक देविदास आवारे, हवालदार पी. टी. चव्हाण, आनंद मस्के यांनी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पोलिस घटनास्थळी वेळेवर हजर होऊ शकले नाहीत.