आपला जिल्हा

बीड शहराच्या विकास कामांसाठी 15 कोटीचा निधी मंजूर- नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीडशहरातील कॅनॉल रोड लगत असलेल्या सिमेंट रस्ते, पंढरी नगरीतील उद्यान आणि बस स्थानकाच्या पाठीमागील सिमेंट रस्त्यासाठी विविध योजनेतून 15 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

बीड शहरातील विविध विकास कामांच्या संदर्भात नगरपालिकेच्या वतीने प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड शहरातील तीन ठिकाणच्या कामासाठी 15 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे यामध्ये विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत नवीन झालेल्या कॅनॉल रोड लगत असलेल्या जवळपास 15 सिमेंट रस्त्यांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा कोटी रुपये मंजूर झाले आहेत यामध्ये पंढरी नगरी येथे सुसज्ज उद्यान उभारण्यात येणार आहे यासाठी पाच कोटीचा निधी तसेच बस स्थानकाचा पाठीमागील रस्ता नगर रोड पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट रस्ता व नाल्या व रोड क्रॉसिंग करण्यात येणार आहे यासाठी पाच कोटीचा निधी मंजूर झाला आहे याच भागात काही महिन्यापूर्वी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी भेट देऊन पाहणी केली होती तेव्हा हा रस्ता करण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासनही दिले होते सध्याच्या कठीण काळात विकासासाठी निधी मिळवून घेण्याचे काम माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा निधी मंजूर झाला असून त्यामुळे वेगवेगळ्या योजनेतून बीड शहरासाठी 15 कोटीचा निधी मंजूर झाला आहे लवकरच ही कामे सुरू केली जाणार असून शहरातील रस्ते दुरुस्तीची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी सांगितले आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close