आरोग्य व शिक्षण

मनोज जाधवांच्या मागणीला यश इंग्रजी शाळेतील आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

 • .                   लाॅक डाऊन मुळे थांबलेली                                 प्रक्रीया  पुन्हा सुरू
      • जिल्ह्यात २ हजार ८५४ विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा

बीड —  बीड जिल्ह्यात २ हजार ८४५ विद्यार्थ्याची आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी निवड करणायत आली आहे. तर २ हजार १३५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती.मात्र लॉकडाऊन मुळे पुढील प्रवेश प्रक्रीयेचे कामकाज झालेले नाही. त्यामुळे निवड होऊन देखील विद्यार्थ्यांना प्रत्येक्षात प्रवेश मिळालेले नाहीत. यामुळे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये गोधळ निर्माण झाला होता.एकीकडे शासनाने ऑनलाईन शैक्षिणक वर्ष सुरू केले आहे. शाळांनीही त्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. पुस्तकांच्या किट देखील वितरित केल्या आहेत.परंतु या पालकांना आपल्या पाल्याचा मोफत प्रवेशासाठी निवड होऊन देखील अधांतरी राहण्याची वेळ आली होती.यात काही पालकांनी आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी मोफत प्रवेशासाठी निवड होऊन देखील पैसे भारत शाळेत प्रवेश घेतले आहेत.कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणीत पालकांना या संकटाचा सामना करावा लागत होता.ही परस्थिती लक्षात घेता शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी आरटीई प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी दी.१४ जून रोजी शिक्षण मंत्री, शिक्षण सचांलनालय,पुणे व शिक्षण विभाग ,बीड यांच्या कडे निवेदना द्वारे केली होती.

परंतु आता लॉकडाऊनमुळे रखडलेली ही ‘ आरटीई ‘ प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे . राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले असून आरटीई प्रवेशासाठी या वर्षी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, असे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधली २५ टक्के आरक्षित जागांच्या मोफत प्रवेशासाठी. राज्यातील ९हजार ३३१ शाळांमधील आरटीईच्या १ लाख १६ हजार ४४६ जागांसाठी २ लाख ९ १ हजार ३७० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते . त्यातील १ लाख ९ २७ विद्यार्थ्यांचे प्रवेश लॉटरी काढून निश्चित करण्यात आले आहेत . तर ७५ हजार ४६५ विद्यार्थ्याची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बीड जिल्ह्यात २ हजार ८५४ विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी निवड करण्यात आली होती. तर २ हजार १३५ विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली होती. ही प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याने कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब पालकांचे आर्थिक नुकसान टळणार आहे. आणि मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रवेशासाठी पालकांना सूचना
 • शाळेकडून प्रवेशाबाबतचा एसएमएस प्राप्त झाल्यानंतर कीव पालकांनी शाळांना संपर्क केल्या नंतर पालकांनी त्या तारखेला शाळेत मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत घेऊन उपस्थित राहावे. कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहून तात्पुरता प्रवेश घ्यावा व शाळेला हमीपत्र लिहून द्यावे .
 • शाळेने दिलेल्या तारखेस उपस्थित राहणे शक्य नसल्यास तसे शाळेला कळवावे व शाळेकडून पुढील तारीख घ्यावी .पालकांना तीन वेळा तारिक घेता येऊ शकते.
 • केवळ शाळेच्या एसएमएसवर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवर बालकाचा अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाच्या तारखेची खात्री करुन घ्यावी .
 • पडताळणी समितीसमोर चुकीची कागदपत्र आढळून आल्यास व आरटीई पोर्टलवर चुकीची माहिती भरण्याचे निदर्शनास आल्यास हमी पत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल .
 •  शाळेने बोलावल्यास किंवा प्रवेशाची तारीख असेल तरच पालकांनी शाळेत जावे . विनाकारण शाळेत गर्दी करु नये .
SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close