Shinde will now fight with shield and sword शिंदे आता ढाल तलवारीने लढणार

मुंबई — राज्यातील शिवसेना दोन गटात विभागल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवले.त्यामुळे दोन्ही गटांना आता स्वतंत्र नाव आणि चिन्ह मिळाले आहे. उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह मिळाले आहे.
उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं आहे. हे कालच निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव देण्यात आलं होतं. मात्र शिंदे गटाला चिन्हांचे पर्याय पुन्हा देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आल्या होत्या. त्यानंतर शिंदे गटाने तीन पर्याय दिले होते.शिंदे गटाला काय चिन्ह मिळणार याची उत्सुकता होती. दोन तलावर आणि एक ढाल असं हे चिन्ह आहे. मुळात शिंदे गटाने तळपता सूर्य हे चिन्ह पहिल्या पसंतीचं सांगितलं होतं. मात्र उगवता सूर्य आणि तळपता सूर्य यात गोंधळ होण्याची शक्यता होती. उगवता सूर्य हे डीएमके पक्षाच चिन्ह आहे. तर तळपता सूर्य हे मिझोरम पार्टीला देण्यात आलेलं आहे.
दरम्यान ढाल-तलवार हे चिन्ह पिपल्स डेमोक्रेटीक मुव्हमेंटला देण्यात आलेलं होतं. मात्र या पक्षाची नोंदणी 2004 मध्ये रदद् करण्यात आली होती. तेव्हापासून हे चिन्ह निवडणूक आयोगाच्या फ्री सिम्बॉलच्या यादीत होतं.