Shivajirao (Dada) Pandit Abhishtchintan Spontaneous Response to Ram Katha शिवाजीराव (दादा) पंडित अभिष्टचिंतन सोहळ्यातील रामकथेला उत्स्फूर्त प्रतिसाद

रामकथेत शबरी- रामचंद्र भेट, बालीवध, लंकादहन
रामायणाचार्य ढोक महाराजांच्या अमृतवाणीने भाविक भक्त मंत्रमुग्ध
गेवराई — माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात संगीत राम कथा ज्ञान यज्ञ आणि कीर्तन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या अमृततुल्य वाणीतून प्रभू रामचंद्राच्या जीवनकार्याचा महिमा सांगणारी राम कथा ज्ञान यज्ञ चालू आहे. आज सहाव्या दिवशी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या रामकथेत ढोक महाराजांनी प्रभु रामचंद्र आणि शबरी भेट, बालीवध व लंकादहन प्रसंगाचे वर्णन केले.
माजी मंत्री शिवाजीराव दादा पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त गेवराई शहरात संगीत राम कथा ज्ञान यज्ञ आणि कीर्तन महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रामायणाचार्य ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांच्या अमृततुल्य वाणीतून प्रभू रामचंद्राच्या जीवनकार्याचा महिमा सांगणारा राम कथा ज्ञान यज्ञ चालू आहे. ढोक महाराजांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून गेल्या पाच दिवसापासून रामायण कथेतून गेवराई आणि परिसरातील भावी भक्तांना मंत्रमुग्ध केले आहे. रामायणग्रंथ महात्मे व शिवपार्वती वीवाह, श्रीराम जन्म, अहिल्याउद्धार, सितास्वयंवर, रामवनवास व केवटकथा, भरतभेट व सिताहरण या राम कथेतील प्रसंगाचे यथार्थ चित्र त्यांनी गेल्या पाच दिवसात मांडले. आज सहाव्या दिवशी शबरी- रामचंद्र भेट, बालीवध, लंकादहन यावर निरुपण केले. रामायणातील व्यक्तिरेखा साकारत ढोक महाराजांनी उपस्थितिंना थेट शबरीच्या कुटीत घेऊन गेले.
“जब मेरे रामजी का आवन होगा , शबरी की कुटीया का पावन होगा ”
अशा गोड कवनातून यावेळी श्री रामचंद्र शबरी भेट आणि त्यानंतर बालीवध आणि हनुमंतानी लंकेतील आक्रमणाचा प्रसंग उभा केला. यावेळी बोलताना ढोक महाराज म्हणाले की, डोळे मिटून शबरीने प्रभु रामचंद्राचे स्वागत केले कारण शबरीचा तीच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता.शबरी के पास एक भी पात्र नही था….पण प्रभूचे पाय धुण्याची तीच्या मध्ये पात्रता होती. शबरी आणि प्रभू रामचंद्राच्या भेटीचे वर्णन ऐकताना उपस्थित महिला आणि पुरुष रममाण झाले होते.
रामायण ग्रंथाची आरती
रामकथेचा प्रारंभी रामायण ग्रंथाची आरती करण्यात आली. आजच्या रामकथेत अमृत डावकर, अनिल गोरे कृष्णकुमार केरुळकर, धोंडीराम चौधरी, महादेव चाटे, प्राचार्या डॉ रजनी शिखरे, प्रमोद गोरकर, सदाशिव तौर, जनार्दन गिरी, अंकुश ढोबळे, पंडित चाळक, कल्याण पवार,अमित पवार,अशोक तौर आणि जालिंदर राऊत यांच्या हस्ते आरती झाली.
गायन वादकांची गोड साथसंगत
रामकथेतील वादक काशिनाथ पाटील, संजय मस्के, गायनाचार्य संंतोष महाराज हे रामकथेस साथसंगत देत असून किर्तन महोत्सव व रामकथेचे सुत्रसंचलन माधव चाटे करत आहेत. रामकथा आणि किर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी अभिष्टचिंतन सोहळा समितीचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत आहेत. उद्या कथेचा शेवटचा दिवस असून यावेळी भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.