क्राईम

ऑनलाइन शिक्षणाचा पहिला बळी, टॅब घेण्यासाठी विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

गेवराई

     एकासतरा वर्षीय नव युवकाने आपल्या आई वडिलाकडे शिक्षाणासाठी टॅब मोबाईल घेण्याची मागणी केली असता, टॅब न दिल्याने त्याने गुरूवार दि.१८ रोजी राहत्या घरी माळवदाच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भोजगाव येथे घडली.

या विषयी पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती आशी की गेवराई तालूक्यातील भोजगाव येथील अभिषेक राजेंद्र संत शिक्षण १० ची परीक्षा दिली होती. निकाल अजुन बाकी होता निकाल लागण्यासाठी काही कालावधी बाकी असताना इथुन पुढचे शिक्षण आता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याने आता आपल्याकडे टॅब मोबाईलची आवश्यकता असल्याने आपल्याकडे मोबाईल नसल्याने त्याची मागणी घरच्याकडे केली असता घराच्याने त्याला थोडे दिवस थाब घेऊ आपण, सध्या बी- बियाने पेरणीचे दिवस आहेत. ते झाले की घेऊ असे म्हणुन सर्वजन शेतामध्ये गेल्यावर त्याने गुरूवार दि.१८ रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली . सदरील घटनेची माहिती गेवराई पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चौबे, पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ, सहाय्यक फोजदार फड, बीट अमलदार बागर यांनी येऊन घटनेचा पंचनाम करून मयताचे शिवेच्छदन करण्यासाठी उपजिल्हा रूग्णालयात गेवराई येथे पाठवले सांयकाळी ६ वा सुमारास शवविच्छेदन करून पार्थीवशरीर नातेवाईकाच्या स्वाधीन करुन रात्री उशीरा भोजगाव येथील स्माशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडिल, एक भाऊ, आजी व आजोबा असा परीवार आहे. त्याच्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close