क्राईम
Majalgaon: Father killed son and wife माजलगाव: बापाने केली मुलाची व पत्नीची हत्या

माजलगाव — मंजरथ येथील काळे वस्ती येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नी व मुलाची हत्या केल्याची घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मंजरथ पासून जवळच असलेल्या काळे वस्तीवरील पांडुरंग दोडतले यांने स्वतःची पत्नी लक्ष्मी पांडुरंग दोडतले व मुलगा पिल्या पांडुरंग दोडकले या दोघांची झोपेत असताना तीक्ष्ण हत्याराने मंगळवारी पहाटे तीन वाजता हत्या केल्याची घटना घडली.दोघा मायलेकराची हत्या केल्यानंतर पांडुरंग दोडतले यांने ग्रामीण पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.यावेळी पोलिसांनी आरोपी पांडुरंग दोडतले यास अटक केली.या घटनेने मंजरथ परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीने हत्या का केली तपास पोलीस करत आहेत.