क्राईम

BJP city president Bhagirath Biyani committed suicide by shooting himself भाजपाचे शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांची गोळी झाडून आत्महत्या

बीड — भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरात स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी आज सकाळी आपल्या राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली.अनेक वर्षांपासून राजकीय, सामाजिक क्षेत्रात सक्रिय होते.गोळीबाराचा आवाज ऐकू आल्यामुळे एकच खळबळ उडाली.बियाणी यांच्या खोलीत जाऊन पाहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.बियाणी यांचे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी बियाणी यांच्या घराची पाहणी केली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.मात्र, बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या का केली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर येऊ शकली नाही. बियाणी यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button