आरोग्य व शिक्षण

आता कोरोनाचा मेंदूवर हल्ला –संशोधकांचा दावा

  • नवी दिल्लीकोरोना विषाणूचे वेगवेगळे लक्षणे दिसून आलेले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या लक्षणांनुसार याचा सर्वाधिक परिणाम फुफ्फुस, किडनी आणि हृदय यावर दिसून आला. मात्र, एका नवीन संशोधनानुसार असे समोर आले आहे की, करोना मेंदूवरही हल्ला करू शकतो. विषाणू मेंदूतील पेशींपर्यंत पोहचला तर फक्‍त तीन दिवसांत विषाणूची संख्या दहा पटीने वाढते. हे संशोधन जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या टीमने केले आहे.

जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’चे प्रा. डॉ. थॉमस यांनी म्हटले की, हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे की, आपला सर्वात महत्त्वाचा अवयव असलेल्या मेंदूवर करोनाचा परिणाम होतो किंवा नाही. मात्र, संशोधनात असे आढळून आले की, करोनाचा परिणाम थेट मेंदूवर होऊ शकतो.

संशोधन कर्त्यांनी या विषाणूचा संबंध लहान मेंदूशीही जोडला आहे. शरीराचा तोल सांभाळणे हे प्रमुख कार्य लहान मेंदूचे असते. यावर करोनाचा परिणाम झाला तर माणसाला साधे उभेही राहता येणार नाही.

शास्त्रज्ञांसमोर आव्हान

शास्त्रज्ञांसमोर असे आव्हान उभे आहे की, मेंदूवर करोनाच्या हल्ल्यामुळे कसा व किती परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेणे. एप्रिल महिन्यात वुहान शहरात केलेल्या संशोधनात 214 करोनाबाधितांपैकी एकतृतियांश रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल आजार होते.

यात स्ट्रोक, एन्यूरिज्म, भोवळ येणे आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे होती. ही लक्षणे गंभीर करोनाबाधित रुग्णांमध्ये होती. त्याचबरोबर स्पेन देशाच्या एका अहवालानुसार, तेथील दोन रुग्णालयांमधील करोना बाधित अर्ध्या रुग्णांमध्ये न्यूरॉलॉजिकल लक्षणं दिसून आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close