क्राईम
Seizure of vehicle of driving school running without license विनापरवाना सुरू असलेल्या ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन जप्त

बीड — उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी शनिवारी परवाना नसलेल्या ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन जप्त केले. गेवराई मध्ये ही कारवाई करण्यात आली.
जिल्ह्यात विनापरवाना ड्रायव्हिंग स्कूल सुरू आहे परिणामी अपघातांचा धोका वाढला आहे. या ड्रायव्हिंग स्कूल मधून प्रशिक्षण देणारे अनुभवी नसल्यामुळे नियमांची पायमल्ली मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही बाब लक्षात येताच उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक गणेश विघ्ने व त्यांच्या सहकार्यांनी गेवराई येथे अवैधरीत्या चालकाचे प्रशिक्षण देणार्या ड्रायव्हिंग स्कूलचे वाहन शनिवारी जप्त केले. या कारवाईमुळे विनापरवाना ड्रायव्हिंग स्कूल चालवणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.