कृषीवार्ता

घोटाळे दडपण्यासाठी जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यातील बाजार समितीत सचिवाची बेकायदेशीर नियुक्ती

मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडील आ.संदिप क्षीरसागरांच्या तक्रारीनंतर गंभीर बाबी उघड

सचिव शिनगारे यांना कार्यमुक्त करण्याचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेश

बीडमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेले घोटाळे दडपण्यासाठी सचिवाची बेकायदेशीरपणे नियुक्ती केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बीडचे आमदार संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदरील तक्रारीच्या अनुषंगाने उपनिबंधक सहकारी संस्था यांनी चौकशी केल्यानंतर यात अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. बेकायदेशीरपणे सचिवाची नियुक्ती केल्याचा स्पष्ट अहवाल देण्यात आला असून बेकायदेशीर नियुक्ती देण्यात आलेल्या सचिव शिनगारे यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी सेवानिवृत्त दामोदर शिनगारे यांची अचानकपणे बेकायदेशीर नियुक्ती करण्यात आली. शासन निर्णयानुसार सदरची नेमणुक बेकायदेशीर असून त्यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे व त्यांना दिलेलेे वेतन व मानधन वसूल करून बाजार समितीवर कायदेशीर कारवाई करावी असे पत्र आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना दिले होते. कृषी उत्पन्न बाजार समिती बीडने सचिव नेमणुकीबाबत ठराव घेवून सदर ठराव पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे पाठवला. परंतू त्यास अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे सदर सचिव यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्याचबरोबर संचालक मंडळाचा ठराव याबाबत शासन निर्णयाचे पालन न केल्याचे दिसून येत आहे. यासह अनेक गंभीर बाबी जिल्हा निबंधक सहकारी संस्था यांच्या चौकशी अहवालात उघड झाल्या आहेत. सदर प्रकरणी लवकरच संबंधित दोषींवर कारवाई होणार असल्याने जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यातील बाजार समितीमध्ये तसेच संचालक मंडळाच्या तंबुत घबराहट पसरल्याची चर्चा सुरू आहे.

बाजार समितीमध्ये अजब कारभार

जयदत्त क्षीरसागरांच्या ताब्यातील बाजार समितीमध्ये अजब कारभार सुरू आहे. बेकायदेशीरपणे नियुक्त केलेल्या सचिवांनी दहा ते बारा कर्मचार्‍यांना आणि उपसचिवाला निलंबीत केले आहे. ज्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे अशा सचिवांनी जयदत्त क्षीरसागरांच्या आदेशावरून सभापती, उपसभापती यांच्या संगनमताने अनेक केवळ राजकीय द्वेष ठेवून अनेक कर्मचार्‍यांचा बळी दिल्याची चर्चा आहे.

सभापती,संचालक मंडळावर होणार कारवाई?

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवपदी दामोदर दशरथ शिनगारे यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आली. याबाबतचा ठराव घाई गडबडीत आणि शासन निर्णयाचे पालन न करता पणन महासंघाची मान्यता न घेता सभापती, उपसभापती, संचालक मंडळ यांनी हस्तक्षेप करून सेवानिवृत्त व्यक्तीकडे सचिव पदाचा कारभार दिला आहे. सदर नियुक्ती करतांना कुठल्याच शासन निर्णयाचे, नियमाचे पालन न झाल्याने सभापती, उपसभापतीसह संचालक मंडळ गोत्यात आले आहे. त्यांच्या कारवाई होणार असल्याचे दिसून येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close