ताज्या घडामोडी

The check bounce; Bar owner sentenced to two years धनादेश वठला नाही; बार मालकाला दोन वर्षांची शिक्षा

बीड — घेतलेले उसने पैसे परत देण्यासाठी साडेसात लाखाचा चेक दिला मात्र तो वटला नाही. याप्रकरणी एका बियर बार मालकास दोन वर्षाची शिक्षा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी इंगळे यांनी सुनावली आहे.
शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव शहाजी संतपराव वरवट असेज्ञआहे. बीड येथील अर्चना अशाेक तावरे या एका इंग्रजी शाळेत शिक्षका आहे. आरोपी शहाजी वरवट हा विक्रम हॉटेल बिअर बार व परमिटरूमचा चालक आहे.आरोपी व फिर्यादी हे एकमेकांचे नातेवाईक देखील आहेत.अर्चना अशोक तावरे यांचे सासरे शिवाजी माधव तावरे यांनी त्यांची जमीन विकली होती. हे माहित असल्याने आरोपी वरवट याने व्यावसाय व घरगुती अडचण सोडविण्यासाठी अर्चना तावरे यांच्याकडे 7 लाख 50 हजार रुपयांची मागणी केली. मागचा व्यवहार व नाते संबंधाचा विचार करुन अर्चना यांनी वरवट यास 7 लाख 50 हजार रुपये हात उसणे दिले. ही रक्कम एक वर्षाच्या आत परत देण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, घरगुती अडचण आल्याने अर्चना तावरे यांनी आरोपी वरवट याच्याकडे हात उसणे दिलेल्या पैशांची मागणी केली. ऐवढी मोठी रोख रक्कम सध्या माझ्याकडे नाही असे सांगत त्यांना बीडच्या उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचा 23 मार्च 2017 रोजीचा धनादेश लिहून दिला.अर्चना तावरे यांनी हा धनादेश दिलेल्या तारखेस वटवण्यास सदरील बँकेत टाकला असता खात्यात पुरेशी रक्कम नाही या शेऱ्यासह तो धनादेश न वटता परत आला. त्यामुळे तावरे यांनी आरोपीस कायदेशीर नोटीस पाठवली. नोटीस आरोपीस मिळून देखील वरवट याने वेळेत रक्कम परत केली नाही. त्यामुळे तावरे यांनी जिल्हा न्यायालयात प्रकरण दाखल केले.या प्रकरणी ॲड. सागर नाईकवाडे यांनी केलेला युक्तीवाद गृह्यधरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.ए. इंगळे यांनी आरोपी शहाजी संतपराव वरवट यास दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच ९ टक्क्या प्रमाणे १५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशित केले. फिर्यादीच्यावतीने ॲड. सागर नाईकवाडे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. राजेश जाधव, ॲड. सुधीर जाधव, ॲड. सतिष गाडे, ॲड. विवेक गाडे यांचे सहकार्य लाभले

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button