आपला जिल्हा

बीडच्या अप्पर जिल्हाधिकारी पदी तुषार ठोंबरे

बीड — अप्पर जिल्हाधिकारी बीड या पदावर तुषार एकनाथ ठोंबरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांची उपजिल्हाधिकारी पुनर्वसन कोल्हापूर या पदावरून पदोन्नतीने बीड येथे बदली झाली आहे. 

पुणे विद्यापीठातून बीए अर्थशास्त्र व विधी शाखेतील पदवी संपादन करून 2001 साली सरळसेवा भरतीने उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली होती. 1962 पासूनचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सर्वाधिक गुणांचा उच्चांक मोडून महाराष्ट्रात सर्वप्रथम आले.
यापूर्वी प्रांताधिकारी बारामती, इचलकरंजी, जत या पदांवर काम. जिल्हा पुनर्वसन अधिकारी पुणे आणि कोल्हापूर या पदांवर तसेच सोलापूर, सांगली, सातारा येथे उपजिल्हाधिकारी भूसंपादन म्हणून काम पाहिले तर यशदा पुणे येथे सामाजिक न्याय विभागाच्या संचालक पदावर काम
केले आहे. त्यांना काव्यलेखन ,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, सामाजिक विषयांवर व्याख्याने या मध्ये आवड आहे.
पुणे विभागातील पुणे , सातारा , सांगली , सोलापूर कोल्हापूर या पाच जिल्ह्यात 2001 ते 2020 या कालावधीत कार्यरत होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close