आपला जिल्हा

परळीच्या कोरोना बाधित महिलेचा औरंगाबाद मध्ये मृत्यू

औरंगाबादपरळी येथील कोरोना बाधित महिलेचा औरंगाबाद येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला.ही महिला मधुमेह हायपर टेन्शन, न्युमोनिया, किडनी चे आजाराने पीडित होती. दोन दिवसापूर्वीच माळेगाव येथील महिलेचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
औरंगाबाद मध्ये रुग्णांचा आकडा दररोज वाढत असून रुग्णसंख्या 3106 वर जाऊन पोहोचली आहे.तर 166 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे परळी येथील एक महिलेला औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत या महिलेला कोरोना असल्याचे उघडकीस आले होते.या महिलेचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला दोन दिवसापूर्वी औरंगाबाद येथे माळेगाव येथील महिलेचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला होता. अहमदनगर येथील महिला आष्टी तालुक्यातील पाटण येथे नातेवाईकांकडे आलेल्या महिलेचा बीडमध्ये कोरोना ने मृत्यू झाला होता. याबरोबरच मातावळी येथील 35 वर्षीय व्यक्ती, माळेगाव येथील 60 वर्षीय महिला तर आता परळी येथील महिलेचा समावेश होऊन मृतांचा आकडा चार वर जाऊन पोहोचला असला तरी परळी येथील महिलेची नोंद आरोग्य विभागाकडे झालेली नाही.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close