ताज्या घडामोडी

Significance of Kojagiri Purnima कोजागिरी पौर्णिमेचे महत्व

हिंदू धर्मातील रीती परंपरा धार्मिक सण हा निसर्गाशी एकरूपता दाखवणारी आहेत त्यापैकीच एक कोजागिरी पौर्णिमा.कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. त्यामुळे चंद्राचे चांदणे हे पृथ्वीवर जास्त पडते. हे चांदणे अधिक शुद्ध आणि सात्विक असल्याचे म्हटले जाते. खगोलशास्त्रीय दृष्ट्या या दिवसाला फारच जास्त महत्व दिले जाते. या दिवशी लक्ष्मी सोबतच चंद्राची पूजा केली जाते.

प्राचीन आणि पौराणिक काळाचा विचार करताही या दिवसाला फारच जास्त महत्व आहे. कोजागिरी पौर्णिमेेच्या आधी नऊ दिवसाची नवरात्र आलेली असते. या नऊ दिवसात शक्ति आणि बुद्धीची देवता पार्वती व तिच्या वेगवगेळ्या रुपांची मनोभावे पूजा करतो. विजयादशमी अर्थात दसरा या दिवशी विजय संपादनासाठी विजयादशमी साजरी केली जाते. याला सीमोल्लंघन देखील म्हणतात. त्यानंतर येणाऱ्या या पौर्णिमेपर्यंत शेतीची कामे देखील अर्ध्यावर आलेली असतात.पावसाळा संपून नवी पिके हाताशी आलेली असतात. पिक हाताशी आल्यामुळे साहजिकच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या घरात लक्ष्मी येत असते त्यामुळे याचाही आनंद या दिवशी साजरा केला जातो.

कोजागिरी पौर्णिमेबद्दलच्या अनेकांच्या वगवेगळ्या धारणा आहेत. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे एक वेगळे महत्व आहे. दमा आणि अस्थमा असणाऱ्यांसाठीही आजचा दिवस फारच महत्वाचा आहे. दमा असणाऱ्यांनी त्यांच्या औषधाचा डोस कोजागिरी पौर्णिमेसाठी तयार केलेल्या दुधात घालावा आणि ते दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवावे. मग दूध प्यावे. या दुधामधील गुणधर्म हे चंद्रप्रकाशामुळे बदलते. ज्याचा फायदा तुम्हाला होतो. थंडीला या काळात सुरुवात होऊ लागते. त्यामुळे गरम दुधात सुकामेवा घातला जातो.असे दूध प्यायल्याने शरीरात उष्णता टिकून राहते.

कोजागिरी पौर्णिमेची विविध नावे कोणती?
कोजागिरी पौर्णिमेला प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे नाव आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात आपण कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा माडी पौर्णिमा असे म्हणतो. त्याच प्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला लोख्खी पुजो, कौमुदी पौर्णिमा, शरद पुनम व आश्विन पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button