क्राईम

अल्पवयीन मुलीचा विवाह लावला; 50 जण कायद्याच्या बेडीत अडकले

गेवराईतालुक्यातील देवपिंप्री डोंगरावरील महादेवाच्या मंदिरात गुपचूप अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याप्रकरणी वधू वराचे आई-वडील भटजी यांच्यासह पन्नास जणांवर बाल विवाह प्रतीबंधक कायद्यान्वये गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेवराई येथील अल्पवयीन मुलीचा गुरुवार दि. 11 जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास देवपिंप्री च्या डोंगरावर असलेल्या महादेवाच्या मंदिरात विवाह लावण्यात आला. या विवाहाची माहिती ग्रामसेवक रोहिणीकांत योगीराज घसिंग यांना मिळाली. त्यांनी मंगळवारी गेवराई पोलिस ठाण्यात या संदर्भात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी माटेगाव चे सतीश खनाळ, सुनिता खनाळ, सुंदर खनाळ यांच्यासोबतच लहू मंचरे, शिवाजी मंचरे, मंदाबाई मंचरे, अंकुश मंचरे, गोपीनाथ मंचरे अज्ञात भटजी यांच्यासह पन्नास जणांविरोधात बाल प्रतिबंधक अधिनियम 2007 अन्वये गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टाकसाळ हे करत आहेत

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close