राजकीय

“Dhanushyaban” symbol temporarily frozen by Election Commission “धनुष्यबाण” चिन्ह निवडणूक आयोगाने तात्पुरतं गोठवलं

मुंबई — ठाकरे व शिंदे गटात “धनुष्यबाण” चिन्हाबाबत सुरू असलेला वाद निवडणूक आयोगाने तात्पुरते चिन्ह गोठवून अखेर संपुष्टात आणला.


शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठी दोन्ही गटाला धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही तसेच शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे.10 ऑक्टोबरपर्यंत नव्या चिन्हासाठी दावा करण्याचे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत.नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत आयोगाला पर्याय द्यायचे आहेत,अशी माहिती मिळाली आहे.निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत ठाकरे व शिंदे गटाच्या दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button