क्राईम

Roadrobbery near Beed; A bullion merchant was robbed of 9 lakhs बीडजवळ रोडरॉबरी; सराफा व्यापाऱ्यास नऊ लाखाला लुटले.

बीड — शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील सराफ आपल्या दुकानातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह घरी परतत असताना बीड-खोकरमोहा रस्त्यावरील कृषी महाविद्यालयाजवळ अज्ञात दरोडेखोरांनी त्यांच्या दुचाकीवर दगडफेक करत जखमी करून गाडी अडवली त्यांच्याजवळ असलेल्या

सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह नगदी रोख रक्कम असा 9 लाखांचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला.
सचीन उद्धव टाक यांचे बीड शहरात सराफा दुकान आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते सोन्या-चांदीच्या व्यवसायामध्ये काम करत आहेत.दुकानावर रोज खोकरमोहा येथून ये — जा करतात. त्यांच्यावर पाळत ठेवून शुक्रवारी संध्याकाळी सातच्या सुमारास टाक गावाकडे जात असताना दबा धरून बसलेल्या अज्ञात लुटारूंनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. ही घटना राजुरी जवळ असलेल्या कृषी महाविद्यालया जवळ घडली. अचानक दगडफेक सुरू झाल्याने सराफा व्यापारी टाकी यांनी आपली मोटार सायकल थांबवली. यावेळी त्यांच्या डोक्याला एक दगड येऊन लागला. स्वतःला सावरत असताना या लुटारूनी सोने चांदी व रोकड असलेली बॅग हिसकावून घेतली. व घटनास्थळावरून पळ काढला या बॅगेमध्ये नऊ लाख रुपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात लुटारू विरोधात कलम 394, 341, 34 भा.दं.वि. नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय राजपूत हे करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button