आपला जिल्हा

केजच्या कोरोनाग्रस्त महिलेचा औरंगाबाद मध्ये मृत्यू

केजतालुक्यातील माळेगाव येथील ६० वर्षीय कोरोना बाधीत असलेल्या वृद्ध महिलेचा औरंगाबादमध्ये आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही महिला किडनी पेशंट असल्यामुळे तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

माळेगाव येथील साठ वर्षीय महिलेची औरंगाबाद येथे किडनी ट्रान्सप्लांट करण्यात आली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तिला 3 जून रोजी रुग्णालयातून सुट्टी देऊन घरी पाठवण्यात आले. परंतु गावाकडे आल्यानंतर पुन्हा किडनीचा त्रास होऊ लागल्यामुळे तिला केज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवसांच्या उपचारानंतर देखील त्रास कमी होत नसल्याने पुन्हा तिला औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात 10 जून रोजी दाखल करण्यात आले. याठिकाणी कोरोना ची लक्षणे दिसून आल्यानंतर स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला. यात ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे 15 जून रोजी मिळालेल्या अहवालात उघडकीस आले. मात्र उपचारादरम्यान तिचा आज सकाळी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close