Nashik: 14 passengers burnt to death in bus and trailer accident नाशिक :बस व ट्रेलर अपघातात 14 प्रवाशांचा जळून मृत्यू

नाशिक — नाशिक-औरंगाबाद रस्त्यावरील नांदूर नाक्याजवळ हॉटेल मिरची चौकात खासगी बस आणि ट्रेलरच्या झालेल्या भीषण अपघातात खासगी प्रवाशी बस जळून खाक झाली.ही आग एवढी भीषण होती की या दुर्घटनेत 14 पेक्षा अधिक प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. ही घटना सकाळी चार वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली.
यवतमाळ हुन काल रात्री नाशिक मार्गे मुंबईकडे जात असलेली खाजगी प्रवासी बस औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात आयशर ट्रकला जोरदार धडकली.या दुर्घटनेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्यामुळे सर्वत्र डिझेल पसरले. दुसरीकडे ही प्रवासी बस दुसऱ्या एका चार चाकी वाहनास जाऊन धडकली. जोरदार धडकेमुळे बस मध्ये स्फोट झाला. त्यामुळे सर्वत्र आग पसरली गेली. 30 प्रवासी घेऊन जात असलेल्या या बसमधील सर्व प्रवासी झोपेत होते. काही समजण्याच्या आत बसने पेट घेतल्यामुळे जवळपास 14 प्रवास यांचा जळून मृत्यू झाला. ज्या प्रवाशांना घटनेचे गांभीर्य लक्षात आलं त्यांनी बस बाहेर धाव घेत मदतीसाठी आकांत सुरू केला. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दुर्घटनास्थळापासून फक्त दीड किलोमीटर अंतरावर अग्निशमन दलाचे केंद्र आहे. मात्र अग्निशामन दलाकडून वेळेवर मदत मिळाली नाही. त्यांना येण्यास तब्बल एक तास
उशीर झाला. पोलीस घटनास्थळी तात्काळ आले त्यानंतर अग्निशमन दल आणि ॲम्बुलन्स पोहोचली. स्थानिक नागरिकांनी आणि रस्त्यावरून जात असलेल्या इतर प्रवाशांनी तोपर्यंत मदत कार्य सुरू केले होते. मात्र रस्त्यावर डिझेल पसरल्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे मदत कार्यात अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.