आरोग्य व शिक्षण

Mr. Sandeep Kshirsagar inspected the ITI building in progress आ.संदीप क्षीरसागरांनी केली काम सुरू असलेल्या आयटीआय इमारतीची पाहणी

रस्ता कामात येत असलेल्या अतिक्रमित संरक्षण भिंतीबाबत बैठक

बीड — मागील काही दिवसांपुर्वी आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून नगरोथान योजने अंतर्गत शहरातील विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते करपरा नदीपर्यंत असलेल्या रस्ता कामात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अतिक्रमित संरक्षण भिंत आडवी येत असल्याने ती पाडून त्या ठिकाणी नवीन संरक्षण भिंत बांधण्यासाठी शुक्रवार दि.7 ऑक्टोबर 2022 रोजी आ.संदीप क्षीरसागर यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली व सुरू असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी केली व संबंधित कंत्राटदार, संबंधित अधिकारी यांना कामाच्या दर्जा बाबत निर्देश दिले.


काही दिवसांपुर्वीच बीड शहरामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून नगरोथान योजने अंतर्गत मंजुर असलेल्या विविध रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्यापैकी राजीव गांधी चौक ते करपरा नदीपर्यंतच्या रस्त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. परंतू शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजुस असलेल्या अतिक्रमीत संरक्षण भिंतीमुळे या रस्ता कामामध्ये अडथळा निर्माण होत असल्याने आ.संदीप क्षीरसागर यांच्या पुढाकारातून सोमवार दि.7 ऑक्टोबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे प्रशिक्षण संस्थेचे प्रशासन, बांधकाम विभाग, नगर परिषद व जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. संबंधित भिंत पाडून त्या ठिकाणी नवीन संरक्षण भिंत बांधण्यासाठी चर्चा करण्यात आली. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यातून गेल्यावर्षी, जिल्हाभरातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणार्‍या संस्थेच्या नवीन इमारतीसाठी भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. या इमारतीचे काम सध्या सुरू असून आ.संदीप क्षीरसागर यांनी या कामाची पाहणी केली व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे धडे देणार्‍या संस्थेच्या कामात कसल्याही प्रकारची उणीव राहू नये असे संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांना सुचित केले. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अतुल केसकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button