Second raid of SP team on same circular gambling den एकाच चक्री जुगार अड्ड्यावर एसपी पथकाचा दुसऱ्यांदा छापा

बीड — शहरातील सम्राट चौकात बंद खोलीत सुरू असलेल्या चक्री जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गुरुवार दि. ऑक्टोबर रोजी छापा मारून अकरा जणांना पकडले.पंधरा दिवसात या जुगार अड्ड्यावरील ही दुसरी कारवाई आहे.
शाहूनगर भागातील सम्राट चौकात एका मोबाईल शॉपी पाठीमागे असलेल्या खोलीत चक्री जुगार पुन्हा सुरू झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या सूचनेवरून विशेष पथकाचे सहाय्यक निरीक्षक विलास हजारे यांनी या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतले.यावेळी फारुख नसीर शेख रा. मसरतनगर, बीड, शेख जमीर शेख सादीक रा. खासबाग देवी मंदिराजवळ,बीड , अनिकेत जीवन पुरी रा. पालवण, ता. बीड , अमोल संजय बारस्कर रा. एकनाथनगर, बीड ,अमर वसंत भानुसे रा. कॅनॉल रोड, बीड, खलील बशीर बागवान रा. नेहरूनगर, कबाड गल्ली बीड, ऋतिक पंडित रकटे रा. संस्कार कॉलनी, गयानगर, बीड, शनि एकनाथ रंजे रा. अंबिका चौक, बीड , अनिल सुंदरराव मुळे रा.एमआयडीसी, पेठ बीड यांना जुगार खेळताना
तर आयडी पुरविणारा बंडू कदम व चक्री जुगारअड्डा चालविणारा आसेफ शेख रा.मसरतनगर, बीड यांना रंगेहाथ पकडले. यापूर्वी 21 सप्टेंबर रोजी एस पीच्या पथकाने या जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती. त्यावेळी आठ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.