कृषीवार्ता

चेक पोस्ट वरून ड्युटी करून घरी निघालेल्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू

बीडमानूर चेक पोस्टवर ड्युटी करून घरी परतत असतांना रायमोह ते शिरूर रस्त्यावर रात्री साडेआठच्या सुमारास शिक्षकाच्या टाटा सुमो व स्विफ्ट कार च्या झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.
रायमोह ते शिरूर रस्त्यावरील तागडगाव फाट्याजवळ टाटा सुमो आणि स्विफ्ट कार ची जोरदार धडक झाली. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली या अपघातात लोणी येथील शाळेवर कार्यरत असणारे परंतु सध्या बीड येथील प्रगती विद्यालयात डेपोटेशन वर असणारे शिक्षक प्रशांत दिगंबर कुलकर्णी हे शिक्षक जागीच ठार झाले. आणखी तीन जण जखमी झाले असून त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती समजताच शिरूर पोलीस ठाण्याचे जमादार अशोक शेळके यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र यात जखमी झालेल्या लोकांची नावे मात्र समजू शकली नाहीत. प्रशांत कुलकर्णी सध्या मानूर चेक पोस्टवर ड्युटी करत असून ड्युटी संपल्यानंतर ते घरी परतत होते. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली भाऊ आई वडील असा परिवार आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close