राजकीय

Voter list program announced for Gram Panchayat general elections ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

बीड — राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 ऑक्टोबर 2022 असून हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2022 आहे. ही माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली.

मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरूवार, दि. 13 ऑक्टोबर 2022, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरूवार दि. 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्वीकारण्यात येतील), प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्याची तारीख शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर 2022 आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button