आरोग्य व शिक्षण

आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रिया रखडली,बीड जिल्ह्यातील २८४५ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

  • कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करा – मनोज जाधव

बीड —  सध्या राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन जन्य परस्थिती मुळे सर्वस्तरातील नागरिक त्रस्त आहेत. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमवल्या आहेत.तर काही जण आर्थिक संकटात सापडले आहेत.यात आपल्या पाल्याचे प्रवेश शाळेत कसे घ्यायचे असा यक्ष प्रश्न पालका समोर उभा राहिला आहे.मात्र बालकांचा शिक्षण हक्क कायद्या (आरटीई) अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेशा मुळे पालकांना दिलासा मिळू शकतो त्या मुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी शिवसंग्रमचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

शैक्षणिक वर्षा २०२० -२१ करिता आरटीई अंतर्गत इंग्रजी शाळेतील मोफत प्रवेश प्रक्रिया शासनाच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात सुरू करण्यात आली होती. देि. १७ मार्च रोजी राज्यस्तरीया लॉटरी पुणे येथे काढण्यात आली. यात २० मार्च रोजी मोफत प्रवेश साठी निवड करण्यात आलेल्या बीड जिल्ह्यातील २ हजार ८४५ विद्यार्थ्याची यादी जाहीर करण्यात आली. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भावा मुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आणि या प्रवेश प्रक्रिया स्थगिती देण्यात आली. मात्र आता लॉकडाऊन मधून शिथिलता देण्यात येत आहे.जनजीवन हळू हळू पूर्वपदावर येत आहे.या मुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन करत नियम व अटी सहित ही प्रवेश प्रक्रिया सुरू करावी या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा प्रत्येक्षात कुठेच संबंध येत नाही. या प्रवेशासाठी पालकांनी कागदपत्र पडताळणी करून प्रेवश मिळू शकतो.तसेच ही प्रवेश प्रक्रिया आत्तच सुरू करणे गरजेचे आहे.कारण ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.तेव्हा आर्थिक संकटात पिचलेल्या गोरगरीब पालकांना दिलासा देण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याची मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close