क्राईम

Rape with married woman threatening to spread obscene photos viral अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

बीड — मामाच्या घरी शिक्षणासाठी राहिलेल्या भाच्याने मामाच्या सुनेचे आंघोळ करताना चे फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना चिंचाळा येथे घडली.
बीड तालुक्यातील गंगनाथवाडी येथील आकाश काळे हा तरुण वडवणी तालुक्यातील चिंचाळा येथे मामाच्या गावी शिक्षणासाठी राहत होता. आकाश काळे यांने वीस वर्षीय मामाच्या सुनेचे आंघोळ करताना चे फोटो काढले. हे फोटो व्हायरल करेल अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. तसेच तीन ऑक्टोबर रोजी त्याने पीडित महिलेच्या पतीसह इतर नातेवाईकांना हे फोटो पाठवले व बदनामी केली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आकाश काळे याच्या विरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल होतात आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याला तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button