क्राईम

बीड शहराचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या मसरत नगर मधील कोरोना बाधित रुग्णांवर गुन्हा दाखल

  • बीडमसरत नगर मधील रहिवासी हैदराबाद हून आले असता. त्यांनी होम कोरंटाइन होणे गरजेचे होते. मात्र शहरातील श्रीमंत असलेली ही व्यक्ती सरकारी नियम पायदळी तुडवत शहरात मोकाट हिंडले. लग्नाला गेले राजकीय वजन वापरत कोविड सेंटरमध्ये जाऊन स्वॅब घेण्यास नकार दिला. बँक रजिस्ट्री ऑफिस या ठिकाणी जाऊन शहराचे आरोग्य धोक्यात आणले. या कुटुंबातील 4 जणांसह, मस्जिद मध्ये लग्नाचे आयोजन करणाऱ्या मुला मुलींच्या वडीला विरुद्ध बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मसरत नगर भागातील एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळून आल्या होत्या. हैदराबाद प्रवासावरून हे कुटुंब आले होते. त्यांना या प्रवासाची परवानगी घेत असतानाच परत आल्यानंतर होम कोरंटाईन होण्यास सांगितले होते. मात्र प्रवासाहून आल्यानंतर या कुटुंबातील व्यक्ती शहरभर मोकाट फिरत बसल्या ढाब्यावर जेवण, लग्न समारंभ, बँक, रजिस्टर ऑफिस या ठिकाणी जाऊन शहराचे आरोग्य धोक्यात आणले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात प्रशासन का टाळाटाळ करत आहे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारला जात होता. मात्र अखेर काल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने या एकाच कुटुंबातील पाच सदस्य व अन्य तीन लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबत मस्जिद मध्ये विनापरवाना विवाह समारंभ आयोजित करून सोशल डिस्टंसिंग च्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वधू-वरांच्या वडिलां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close