Sale of ration cards in the supply department is again started in black market, Rajaros पुरवठा विभागातील शिधापत्रिकांचा पुन्हा काळाबाजार, राजरोस विक्री सुरू

बीड — साडेपाच हजार शिधापत्रिका गहाळ झाल्याचे प्रकरण या भ्रष्टाचारात सामील असणारांनी आर्थिक जोरावर थंड केले.अस असताना तहसील परिसरात पुन्हा शिधापत्रिकांची राजरोस विक्री चालू असल्याचा धक्कादायक प्रकार घडू लागला आहे.
बीड तहसील कार्यालया मधून तब्बल 5498 शिधापत्रिका गायब झाल्या होत्या.मात्र भ्रष्टाचारात लिप्त असलेल्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तोंड देखील या प्रकरणात बंद केली. त्यामुळे हे प्रकरण थंड झाले. हे प्रकरण दडपण्यात यश आल्यानंतर पुन्हा याच प्रकरणाची पुनरावृत्ती होत असल्याचं दिसून येऊ लागला आहे. तहसीलच्या आवारात पुन्हा शिधापत्रिका विक्री होऊ लागली आहे. याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना असली तरी ते या विषयावर गप्प बसून चाललय ते चालू द्या आशा भूमिकेत असल्याचं दिसून येत आहे. नवीन शिधापत्रिका किती विक्री झाल्या किती चोरीला गेल्या याकडे लक्ष द्यायला कुणाला वेळच नाही. पुरवठा विभागातून दलालांना या शिधापत्रिका विकणारा तो चष्म्यावाला शिपाई कोण? शिधापत्रिका विकत घेत
काळा बाजारात विकणारे दलाल कोण? त्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ अधिकारी प्रयत्न करणार काय? या शिधापत्रिकाच्या माध्यमातून देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवण्यासाठी तर प्रयत्न केले जात नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.