आरोग्य व शिक्षण

वास आणि चव घेण्याची क्षमता संपुष्टात येण असू शकतं कोरोनाच लक्षण

नवी दिल्लीविविधतेने नटलेल्या भारतात कोरोना संक्रमणाच प्रमाण गतीनं वाढतांना दिसून येत आहे. मात्र कोरोनाची लक्षणही विविधता दाखवत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरू असलेल्या संशोधनातून ही बाब समोर येत आहे.आरोग्य मंत्रालयाकडून आज आणखीन दोन लक्षणांचा कोरोना लक्षणांच्या यादीत समावेश केला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या (Health ministry) म्हणण्यानुसार वास आणि चव घेण्याची क्षमता संपुष्टात येणं (Loss of taste or smell) हे देखील करोनाची लक्षणं आहेत. 

करोनाची चाचणी करण्यासाठीच्या निकषांमध्ये अचानक तोंडाची चव जाणं, गंधाची जाणीव जाणं या लक्षणांचाही आता समावेश करण्यात आला आहे.
करोना संक्रमणात ताप, खोकला, अशक्तपणा, श्वसन प्रक्रियेत अडथळा यांसारख्या लक्षणांच्या जोडीलाच तोंडाची चव जाणे, गंधाची जाणीव जाणे ही लक्षणं अनेक रुग्णांमध्ये आढळून आली आहेत. ‘नॅशनल टास्क फोर्स’च्या बैठकीत या संदर्भात चर्चाही झाली होती. करोनाचे अनेक रुग्ण या तक्रारी करत असल्याने या बैठकीत ही दोन लक्षणे करोना चाचणी करण्यासाठीचे निकष म्हणून निश्चित केलेल्या लक्षणांच्या यादीत समाविष्ट करावीत, असा आग्रह काही सदस्यांनी धरला होता. 
गंभीर स्वरुपाची लक्षणं न आढळणारे अनेक रुग्ण भारतात आढळले आहेत. परंतु, त्यांची करोना चाचणी मात्र पॉझिटिव्ह आली. अशा रुग्णांना ‘असिम्प्टमॅटिक’ अर्थात कोणतीही लक्षणं नसलेला रुग्ण म्हणून ओळखलं जातं.

तज्ज्ञांच्या मते ही लक्षणे साध्या फ्लूमध्येही दिसत असल्याने ती करोनाची विशिष्ट लक्षणे म्हणून नोंदवता येणार नसली, तरी करोना संसर्गामध्ये ही लक्षणे लवकर आढळत असल्याने तातडीने निदान करून उपचार सुरू करण्याच्या दृष्टीने मदत होऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेच्या राष्ट्रीय रोगनियंत्रण आणि प्रतिबंध विभागानं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच या दोन लक्षणांचा समावेश करोना लक्षणांच्या यादीत केला होता. 

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close