महाराष्ट्र

In Seva Pandharwada, Mahavitaran gave 58 thousand new electricity connections सेवा पंधरवाड्यात महावितरणने दिल्या ५८ हजारावर नवीन वीजजोडण्या

मुंबई —पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात महावितरणने विशेष कामगिरी बजावत केवळ १५ दिवसांत ५८ हजार ४५७ घरगुती ग्राहकांना नवीन वीजजोडण्या दिल्या आहेत. याशिवाय प्रलंबित असलेल्या ४४ हजार ६६९ ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्याचे सर्व अर्ज निकाली काढत राज्य शासनाच्या या उपक्रमाचे महावितरणने १०० टक्के उद्दीष्ट साध्य केले आहे.

दि. १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर२०२२ या पंधरवड्यात ग्राहकांच्या प्रलंबित असलेल्या विशेषत: नवीन वीजजोडणी व ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करणे या प्रकारच्या तक्रारींचे निवारण या पंधरवड्यात करण्यात यावे असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी दिले होते. महावितरणने नवीन
वीजजोडणीसोबतच ग्राहकांच्या वीजबिलावरीलनावात बदल करण्याची ऑनलाईन
सुविधा उपलब्ध करून
दिली आहे. नवीन ग्राहकांना
वीजजोडणीसाठी रहिवाशी असल्याच्या एखाद्या दाखल्यासोबत सुरक्षा ठेव रक्कम भरावी लागते. तसेच वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी
स्थानिक स्वराज्य संस्था
किंवा सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

क्षेत्रीय स्तरावर दि.
१० सप्टेंबर पर्यन्त
पैशाचा भरणा करून प्रलंबित असलेल्या ५८ हजार ४५७ नवीन घरगुती वीजजोडणीच्या अर्जावर
त्वरित कार्यवाही करून सेवा पंधरवाड्यात सर्व
ग्राहकांना नवीन
वीजजोडण्या देऊन १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.घरगुती ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून यात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ५२८, कोंकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २५ हजार ६८५, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ९७५ आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत ९ हजार ६७३ नवीन घरगुती वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

याशिवाय ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यासाठी ४४ हजार ६६९ ग्राहकांचे अर्ज वैध ठरविण्यात आले असून या सर्व ग्राहकांच्या नावात बदल करण्यात आले आहे. ग्राहकांच्या वीजबिलावरील नावात बदल करण्यात आलेल्या अर्जाची प्रादेशिकनिहाय संख्या पुढीलप्रमाणे असून यात औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत ३ हजार २८५, कोंकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत २० हजार २८३, नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत ६ हजार ३०० आणि पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत १४ हजार ८०१ ग्राहकांचा समावेश आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button