देश विदेश

भारत डेंजर झोनमध्ये : पुन्हा होऊ शकते लॉकडाउन

नवी दिल्लीभारत अनलाॅक १ च्या माध्यमातून हळूहळू सर्व येथील करण्यात येत असले तरी वाढत्या रुग्ण संख्या मुळे चिंतेत अधिक भर पडली आहे. लॉक डाउन शिथिल करण्याचा निर्णय हानीकारक ठरण्याची शक्यता एका संस्थेने केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे. जपान स्थित सुरक्षेशी संबंधित नोमुरा संस्थेने कोरोना प्रादुर्भाव झाल्यानंतर जगातील 45 देशांच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला यात भारत डेंजर झोन मध्ये आहे. भारतात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होऊन लोक डाऊन होऊ शकते असेही स्पष्ट करण्यात आले आहे

                           देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने अडीच महिन्यांसाठी देशात लाॅक डाऊन लागू केले. आता ते शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच जपानच्या नोमुरा संस्थेने केलेल्या अभ्यासामुळे देशाच्या चिंतेत भर पडली आहे. नोमूराच्या संशोधनात 45 देशांच्या अर्थव्यवस्थेची श्रेणी निहाय विभागणी केली आहे.यात पहिली श्रेणी ऑन ट्रॅक, दुसरी वॉर्निंग साइन व तिसरी डेंजर झोन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. नोमुरानं केलेल्या अभ्यासानुसार लॉकडाउन हटवल्यानं दोन प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
पहिली स्थिती (चांगले संकेत)लॉकडाउन हटवल्यानंतर लोकांचं कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण वाढेल. दररोज काही प्रमाणात रुग्णांची संख्या वाढू शकते. पण, लोकांची भीती कमी होईल. त्यामुळे व्यवसाय सुरू होतील, जनजीवन पूर्वपदावर येईल. जसंजशी रुग्णांची संख्या कमी होईल, तसे सकारात्मक परिणाम दिसून येतील.

दुसरी स्थिती (वाईट परिणाम) — लॉकडाउन हटवून अर्थव्यवस्थेला चालना देतानाच कोरोनाचं संक्रमण वाढत जाईल. त्याचबरोबर बाधित रुग्णांची संख्याही वाढत जाईल. यामुळे लोकांच्या मनात भीती वाढेल आणि जनजीवन पुन्हा विस्कळीत होईल. अत्यंत गंभीर स्थितीत लॉकडाउन पुन्हा लादला जाऊ शकतो, असा निष्कर्ष नोमुराच्या अभ्यासात मांडण्यात आला आहे. दरम्यान सुरुवातीलाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लॉक डाऊन संपूर्णपणे फेल गेले असल्याची टीका केली होती. लॉक डाऊन नंतर इतर देशांच्या तुलनेत भारतातील रुग्ण संख्येत होणारी वाढ चिंतेत भर घालणारी असल्याचं ग्राफ वरून त्यांनी स्पष्ट केलं होतं

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close