पाणी आणण्यासाठी गेलेल्या आई व मुलाचा विहिरीत पडून मृत्यू Mother and son who went to fetch water fell into the well and died

कडा — घरा शेजारीच असलेल्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या मायलेकरांचा विहिरीत पडून मुत्यु झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री आठच्या सुमारास डोंगरगण येथील शिंदे वस्तीवर घडली आहे.
वर्षा भगवान शेंडे(वय २२ वर्षे) आणि आर्यन भगवान शेंडे(वय २ वर्षे) अशी मृत मायलेकांची नावे आहेत.आष्टी तालुक्यातील डोंगरगण येथील शेंडेवस्तीवर राहत असेलेली वर्षा शेंडे शनिवारी रात्री आठच्या सुमारास पिण्याचे पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली. यावेळी तिच्यासोबत दोन वर्षाचा मुलगा आर्यन शेंडेदेखील होता. विहीरीतून पाणी शेंदताना त्यांचा तोल गेला आणि माय-लेक विहिरीत पडले. या घटनेत महिला आणि तिच्या चिमुकल्याचा जागीच मुत्यू झाला. पती भगवान शेंडे हा कामाला गेल्याने उशिरा घरी आला. मुलगा व त्याची आई घरी नसल्याने इकडे तिकडे शोध घेतला असता विहीरीत पडल्याचे दिसून आले. अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, अंमलदार दत्ता टकले, प्रशांत कांबळे, शिवदास केदार, संतोष राठोड यांनी पंचनामा केला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले.