क्राईम
अज्ञात वाहनाने वृद्ध महिलेस चिरडले. An elderly woman was crushed by an unknown vehicle

माजलगाव — पायी जात असलेल्या 60 वर्षीय वृध्द महिलेस अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथे शनिवारी रात्री घडली.
बिस्मीलाबी आमेर उद्दीन शेख वय 60 वर्ष रा.गंगामसला या गंगामसला येथे रस्त्याच्या कडेने पायी जात असताना एका भरधाव वेगात आलेल्या वाहनाने त्यांना चिरडले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात हलवले. मात्र रूग्णालयात जाण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती माजलगाव ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. आज सकाळी माजलगाव ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालका विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे