क्राईम
वीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार आरोपीवर गुन्हा दाखल. A case has been registered against the accused for raping a twenty-year-old married woman

नेकनूर — शेतातून घरी जात असलेल्या विवाहितेवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना धावज्याची वाडी येथे घडली याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वीस वर्षीय महिला शेतातून घरी जात होती यावेळी सोमनाथ सुधाकर काटे रा.धावज्याचीवाडी याने विवाहित महिलेचा विनयभंग करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्यात येईल अशी धमकीही दिली. याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा नोंद झाला होता. मात्र हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याची माहिती पीडीतेने न्यायालयाला दिली. त्यानंतर नेकनूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.