क्राईम

वाळूने भरलेल्या हायवाने तहसीलदारांच्या गाडीला दिली धडक; माज जिरवू , जनतेने सहकार्य करावे– रेखावार

  • तहसीलदार जाधवर यांना जीवे मारण्याचा प्रयत्न

  • जिल्हाधिकारी रेखावार घटनास्थळी चार तास उभे

गेवराईवाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने बीडकडे निघालेल्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या स्विफ्ट गाडीला पाठीमागून धडक देऊन, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी ता. 11 रोजी सायंकाळी सहा वाजता गढी जवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी रेखावार तातडीने घटनास्थळी पोहोचले. तहसिलदार जाधवर बालंबाल अपघातात बचावले आहेत. गाडीचे नुकसान झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन, दोन्ही गाड्या ठाण्यात लावल्या आहेत. दरम्यान, वाळू तस्करी करणार्‍यांचा माज जिरवू , मात्र चांगल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेने पाठिंबा द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या गाडीला वाळूने भरलेल्या हायवाने पाठीमागून धडक दिल्याची घटना गुरुवारी 6:30 वा. सुमारास गढीजवळ घडली असून तहसीलदार जाधवर बालंबाल बचावले आहेत.
गेवराई तालुक्यातील गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असून आज सायंकाळी 6:30 च्या सुमारास अवैध वाळू वाहतुक करणारा हायवा आढळून आल्यानंतर त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतू , चालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली.
तहसीलदार प्रशांत जाधवर यांची गाडी हायवाच्या समोर येताच स्विफ्टला धडक देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी हायवा ताब्यात घेतला असून चालक फरार झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम चोबे दाखल झाले असून सदरील आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रेखावार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, घटना गंभीर असून, अवैध वाळू उपसा करणार्‍यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने आवश्यक पाऊले उचलून, कठोर निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगून ते म्हणाले की, वाळू तस्करी करणार्‍यांचा माज उतरवू, मात्र नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ही जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले असून, आरोपीला तात्काळ अटक करून, कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

SHARE

Related Articles

Back to top button
Close
Close