ताज्या घडामोडी

शिवणी येथे ५ ऑक्टोंबर रोजी तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद. 3rd All India Buddhist Dhamma Conference on 5th October at Shivani

बीड मध्ये पहिल्यांदाच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन

बीड — तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद बीड २०२२ व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन बुधवार दि. ५ ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता डॉ.भदंत आनंद कौसल्यायन नगर, मौजे शिवणी.ता.बीड येथे पार पडणार असल्याची माहिती मुख्य संयोजक पु. भिक्खु धम्मशिल यांनी दिली. यावेळी प्रा.प्रदिप रोडे,प्रा.राम गायकवाड यांची उपस्थिती होती.

५ ऑक्टोंबर रोजी पार पडणारी तिसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदचे प्रमुख मार्गदर्शक पु.भिक्खु डॉ.उपगुप्त महाथेरो, पुर्णा यांची उपस्थिती राहणार आहे. धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून देवगिरी वृत्त औरंगाबाद चे मुख्य संपादक अनिल भानुदास सावंत यांची उपस्थिती असणार आहे. ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड येथून बुद्धमुर्तीसह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पवित्र अस्थिकलश,पु.भिक्खु संघ,उपासक, उपासिका यांच्यासह धम्म मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा – कारंजा – बलभीम चौक – टिळक रोड – सुभाष रोड – डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन व धम्म ध्वजारोहण करून नाळवंडी नाका – तेलगाव नाका ते शिवणी येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे.
ऐतिहासिक बोधी वृक्षाची पूजा शिवणी येथे सकाळी १० वाजता होणार आहे.त्यानंतर सकाळी १०:३० वाजता पु.भिक्खु डॉ. इंदवंस्स महाथेरो (मुंबई) यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होणार आहे. सकाळी १० ते १२ या दरम्यान शाहीर प्रा.दिपक जमदाडे व संच बीड भीम व बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
धम्म परिषदेचे उद्घाटन पु.भिक्खु सुमणवण्णो यांच्या हस्ते दुपारी १२ वाजता होणार आहे.यावेळी धम्म परिषदेचे अध्यक्ष म्हणून पु.भिक्खु धम्मसेवक महाथेरो (मुळावा) यांची उपस्थिती असणार आहे. धम्म परिषदेत पु.भिक्खु प्राचार्य डॉ.खेमधम्मो महाथेरो (मुळावा),पु.भिक्खु पज्जातिस्स महाथेरो ( सिरसाळा),पु.भिक्खु ज्ञानरक्षित थेरो (औरंगाबाद),पु.भिक्खु महविरो थेरो (अहमदपूर),पु.भिक्खु धम्मज्योती थेरो (औरंगाबाद),पु.भिक्खु पज्जाबोधी थेरो (नांदेड) यांची प्रमुख धम्मदेसना होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी आयुक्त समाजकल्याण विभाग,पुणे प्रशांत नारनवरे (भा.प्र.से), बीड जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित पवार, निवृत्त कमिशनर समाजकल्याण विभाग पुणे आर.के.गायकवाड, बीड अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, बीड तहसीलदार सुहास हजारे यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मुख्य संयोजक पु.भिक्खु धम्मशिल यांनी दिली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button