देश विदेश

लोणार सरोवराचं पाणी अचानक झालं गुलाबी

बुलढाणाउल्कापातामुळे निर्माण झालेले बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर जगातील आश्चर्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं सरोवर आहे. मात्र या सरोवरात आश्चर्यकारक बदल होऊन यातील पाणी चक्क गुलाबी लाल रंगाचे झाल्याचे लक्षात आले आहे. हा नैसर्गिक चमत्कार नेमका काय आहे याबाबत आता अभ्यास केला जाणार आहे.

प्रा, सुधाकर बुगदान हे सरोवराच्या जतनासाठी परिश्रम घेत आहेत.. तसेच त्याचा अभ्यास देखील करत आहे. सध्या सरोवराचे पाणी लाल झाले याविषयी त्यांनी सांगितले की हे पाणी साधे पाणी नसून रासायनिक द्रव्य आहे. या पाण्यात क्षारयुक्त पदार्थ असल्याने ते खारे आहे. काही वर्षांपर्यंत हे प्रमाण १४.५ % होते मात्र प्रदूषणामुळे ते ९.५ % झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाणी कमी होते. आणि रंग फिकट पिवळा होतो. मात्र वाढत्या प्रदूषणामुळे सरोवरातील अल्कधर्मी पाण्यात आमला गुणधर्म आल्याने पाणी लाल झाल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
लोणार सरोवरातील पाणी लाल-गुलाबी होण्याबाबत स्थानिकांच वेगळच मत आहे. लोणार सरोवरात शहरातील घाण पाणी जाते. त्यामुळे सरोवरात प्रदूषण होत आहे. प्रदुषणामुळेच लोणार सरोवराचे पाणी गढूळ दिसत आहे, ते लाल रंगाचे नाही, असा त्यांचा दावा आहे. शहरातील घाण आणि सांडपाणी सरोवरात जाऊ नये म्हणून शासनाने निरीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करून शुद्ध पाण्याचा प्रकल्प उभा केला. पण तो बंदच आहे. त्यामुळे प्रदुषण वाढल्यानेच हा प्रकार घडला असावा, असे मत लोणार सरोवर विकास व जतन समितीचे सदस्य प्रा. बळीराम मापारी यांनी व्यक्त केले.लोणार सरोवराच्या अभ्यासकांमध्येही याबाबत मतभिन्नता असल्याचे समोर येत आहे. मात्र हे पाणी लालसर झाल्याबॅक्टेरिया वाढल्यामुळे एका रात्री असा बदल होऊ शकत नाही त्यामुळे याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close