क्राईम

दुहेरी हत्याकांडाचे गुढ उलगडले; सोन्यासाठी चुलत भाऊ, मेव्हण्याने काढला काटा

  • औरंगाबाद —  सातारा परिसरात बहीण-भावाच्या गळा चिरून झालेल्या निर्घृण हत्येने एकच खळबळ माजली होती मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचे गुढ उलगडले. घरात असलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुन्याणेच  ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश काळूराम खंदाडे रा.पाचन वडगाव, अर्जुन देवचंद राजपूत रा.वैजापूर या दोघांना ताब्यात घेतले असून मुद्देमाल जप्त केला आहे.

गुरुवारी सातारा परिसर भागात किरण खंदाडे-राजपूत वय १८ वर्ष सौरभ खंदाडे-राजपूत वय१६ वर्ष या दोघांची राहत्या घरी गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास चक्र फिरवली. घराची बारकाईने पाहणी केली असता पोलिसांना घरात चार कप आढळून आली त्यावरून हे हत्याकांड जवळच्या व्यक्तीने केले असावे असा संशय पोलिसांना आला. या दोघांच्या मोबाईलची तपासणी केली असता या संशयाला बळकटी मिळाली व पोलिसांची संशयाची सुई चुलत भाऊ सतीश खंदाडे व त्याचा मेहुना अर्जुन राजपूत यांच्या कडे वळली. या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर सुरवातीला तोंड उघडले नाही मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. हे खून सोन्यासाठी केले असल्याचे त्यांनी कबूल केले. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेला गेलेलं सोन व रोख रक्कम जप्त केली

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close