अर्धवट कामाचे उद्घाटन करून जनतेची दिशाभूल ;प्रतिकात्मक रेल्वे चालवून केले”सत्याग्रह आंदोलन “. By inaugurating a partial work, misleading the public; by running symbolic trains, “Satyagraha Movement” was carried out.

बीड — नगर-बीड-परळी या प्रलंबित रेल्वे मार्गाच्या कामाचे उद्घाटन करताना यासाठी सातत्याने आंदोलने ऊभारून शासन दरबारी पाठपुरावा करणा-या विद्यार्थी युवा रेल्वे कृती समिती, स्वातंत्र्य सैनिक रेल्वे कृती समिती,नागरी युवक संघटना,युक्रांद संघटना आदिंना निमंत्रण न दिल्याच्या तसेच अर्धवट कामाचे उद्घाटन शासन आणि लोकप्रतिनिधींकडून दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ व रेल्वे आंदोलनकर्ते यांच्या सन्मानार्थ तसेच उर्वरीत काम तातडीने पुर्ण करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली दि.०२ ऑक्टोबर २०२२ वार रविवार रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रतिकात्मक रेल्वे चालवून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले
आंदोलनात अशोक हांगे, सी.ए.अशोक जाधव,शेख युनुस च-हाटकर, राहुल कवठेकर, सय्यद आबेद ,शेख मुबीन, किस्किंदाताई पांचाळ, शेख मुस्ताक,अशोक येडे, संतोष ढाकणे आदि सहभागी झाले होते . निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी बीड संतोष राऊत यांच्यामार्फत पंतप्रधान,रेल्वेमंत्री,यांना देण्यात आले.
.
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे कृती समिती व विद्यार्थी युवा रेल्वे कृती समिती पदाधिका-यांची आंदोलनस्थळी भेट
स्वातंत्र्य सैनिक रेल्वे समितीचे पदाधिकारी नामदेवराव क्षीरसागर,आ.सुनिल धांडे, सत्यनारायण लाहोटी,मंगेश लोळगे तसेच विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अशोक हांगे,संगमेश्वर आंधळकर , रामनाथ खोड,निळकंठ वडमारे ,प्रा. पंडित तुपे, सुरेश पाटोळे सी. ए.जाधव ,यांनी आंदोलनस्थळी भेट दिली त्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली .
२२ वर्षात केवळ ६६ किलोमीटर काम आणि ३५४ कोटीचा रेल्वे प्रकल्प पोहोचला ४८०० कोटींवर
१९९५ साली नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाला तत्वतः मंजुरी मिळाली.
अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकुण लांबी २६१ किलोमीटर असुन
अहमदनगर पासुन आष्टी पर्यंत केवळ ६७ किलोमीटर अंतराचे काम पुर्ण करण्यात आले आहे. अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान ७ किलोमीटर अंतरावर मार्च २०१८ मध्ये ७ डब्यांची रेल्वेची चाचणी झाली होती त्यानंतर अहमदनगर-नारायणडोह-सोलापूरवाडी या १५ किलोमीटर अंतरावर २५ फैब्रुवारी २०१९ रोजी ७ डब्यांची रेल्वे चाचणी झाली होती त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी ३२ किलोमीटर अंतरावर २० डिसेंबर २०२१ रोजी चाचणी घेण्यात आली होती.
अनेक वर्ष राजकीय इच्छाशक्ति अभावी रेल्वे मार्गाचे काम रखडल्यामुळे ३५४ कोटीचा प्रकल्प ४८०० कोटीच्या आसपास पोहचला आहे. मागील २२ वर्षांत केवळ ६७ किलोमीटरचे काम पुर्ण झाले असून २०२४ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्धवट उद्घाटन करून शासन व लोकप्रतिनिधींकडून जनतेची दिशाभूल होत असून उर्वरीत काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.