आपला जिल्हा

प्रहारच्या “घर बैठ” आंदोलनाची दखल राज्यमंत्री बच्चुभाऊ यांनी सचिवास अहवाल सादर करण्याचे दिले आदेश

मुंबईअतिथी निदेशक अर्थात चित्रकला, कार्यानुभव व क्रीडा शिक्षक तसेच संगणक शिक्षक यांच्या प्रलंबित नियुक्तीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना यांच्या वतीने राज्यभर घरबैठे आंदोलन दि ५ जुन २०२० रोजी करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत शालेयशिक्षण राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी यासंबधी अहवाल सादर करण्याचे आदेश श्रीम. कृष्णा वंदना, सचिव, शालेय शिक्षण यांना दिले आहेत

.

निदेशक व संगणक शिक्षक यांची नियुक्ती महत्वाची आहे. या चालु शैक्षणिक सत्रात त्यांना नियुक्ती द्यावी यासाठी प्रहारचा लढा यश येइपर्यन्त चालु राहील.

संतोष राजगुरू
अध्यक्ष, मराठवाडा विभाग,
प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, महा. राज्य

महाराष्ट्र राज्यातील अंशकालीन निदेशक अर्थान चित्रकला, कार्यानुभव व क्रीडाशिक्षक यांना गेल्या वर्षापासून नियुक्त्या दिल्या नाहीत. एकीकडे शासनाने नियुक्त्या दिल्या नाहीत आणि लोक डाऊनमूळे मजूरी नाही, अशा अवस्थेत हे शिक्षक सापडलेले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत व कौशल्यात वाढ होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे असून चित्रकला,कार्यानुभव व शारिरीक शिक्षण हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय आहेत. त्याकरिता विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याण्यासाठी या निदेशकांची नियुक्ती गरजेची आहे.
शिवाय शिक्षणात संगणकाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊन काळामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी संगणक व ई लर्निंग आदी सुविधा देणे गरजेचे आहे. मात्र यासाठी तज्ञ असलेल्या संगणक शिक्षकांना अध्याप नियुक्ती दिलेल्या नाहीत. राज्यात इयत्ता नववी व दहावी करिता संगणक शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांना देखील मागील वर्षापासून नियुक्ती देण्यात आली नाही. संगणक शिक्षक नसल्याने नववी व दहावी साठी आयसीटी विषय केवळ नावाला शिकवला जातो. विद्यार्थ्यांना संगणक अध्यापनाकरिता शाळेला मिळालेल्या ३३ लाखाच्या संगणक लॅब शिक्षक नसल्यामुळे धूळखात पडून आहेत. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता या शिक्षकांनाही नियुक्त देणे गरजेचे आहे. अशी मागणी सरकारला करुन या नियुक्तीकडे लक्ष्यवेधण्यासाठी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने १६००० शिक्षकांच्या साथीने राज्यभर घर बैठे आंदोलन केले होते. याची दखल राज्यमंत्री बच्चूभाऊ यांनी घेतली असुन नियुक्ती संबधित माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत.

या बद्ल संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. अजय तापकिर, सरचिटणीस श्री विकास घुगे व मराठवाडा विभाग अध्यक्ष श्री संतोष राजगुरु यांनी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांच्या निर्णयाचे स्वागत करुन त्यांचे आभार मानले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close