राजकीय

उद्धव ठाकरेंना1996 मध्ये मुख्यमंत्री व्हायचं होतं हे सांगायला नवलेंना 26 वर्ष का लागली ? Why did it take 26 years for Navale to tell Uddhav Thackeray that he wanted to become Chief Minister in 1996?

बीड — माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सत्तेचे लोभी असून मुख्यमंत्री होण्याची त्यांच्यात लालसा होती अस वक्तव्य करून माजी मंत्री सुरेश नवले यांनी शनिवारी राजकीय चर्चेला पुन्हा तोंड फोडले.26 वर्षाच्या काळात दुसऱ्या पक्षात राहून राजकीय व्यासपीठावरून विरोधात टीका टिप्पणी प्रा.नवलेंनी केली मात्र कधीच त्यांनी उद्धव ठाकरे सत्ता लोभी असल्याचं म्हटलं नाही.मात्र स्वतःची राजकीय जमीन शिंदेंच्या नांगराने वजवून काढताना उद्धव ठाकरे सत्ता लोभी असल्याचा साक्षात्कार झाला काय? ठाकरें वर टीका करून पुन्हा पूर्वीचा वकूब निर्माण होईल काय? शिंदे गटाकडून पुन्हा उमेदवारी मिळावी व आपली राजकीय कारकीर्द पुन्हा तळपावी यासाठी हा खटाटोप आहे काय? असे एक ना अनेक प्रश्न सामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाल्यानंतर अडगळीत पडलेल्यानाही नवे धुमारे फूटू लागले आहेत. शिंदे फडणवीस शिवसेना संपवण्यासाठी आटापिटा करत आहेत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे पुन्हा शिवसेनेची मोट बांधण्यात सर्व ताकद पणाला लावत आहेत. हा सत्ता संघर्ष सर्वसामान्य माणूस उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटाचे नेते एकमेका विरोधात गरळ ओकत आहेत.महाराष्ट्रातील जनतेच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवत प्रखर हिंदुत्ववाद ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिकवला त्या बाळासाहेबांना जनता हिंदू हृदय सम्राट म्हणून आजही आपल्या हृदयाच्या कोपऱ्यात प्रत्येक मराठ्याने स्थान दिले आहे.तर दुसरीकडे ज्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्या गुजराती लोकांच्या वळचणीला शिवसेनेचा दुसरा गट जाऊन बसला. पुन्हा मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते की काय? अशी भीती सर्वसामान्यातून व्यक्त केली जात आहे.
या सर्व अस्थिरतेच्या राजकारणात राजकीय विजनवासात गेलेले नेते यांना साक्षात्कार होऊ लागल्याचं पाहायला मिळू लागलं. अन पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलं. इतिहास पुन्हा बोलता झाला. 1990 व 1995 मध्ये राज्यातील पहिला उमेदवार बाळासाहेब ठाकरे यांनी भर सभेत घोषित केला त्याचं नाव प्रा.सुरेश नवले होतं. पुढे हेच नवले शिवसेनेतून नारायण राणेचं बोट धरून फुटून बाजूला झाले. राणें सोबत ते काँग्रेसमध्ये गेले. तेथे त्यांना विधान परिषद मिळाली पण या घडामोडीत त्यांच्याकडे असलेली सर्व जनमानसातील राजकीय ऊर्जा निघून गेली. जनतेने त्यांना स्थान दिलं नाही.पुन्हा राजकीय बस्तान बसवण्याचा नवलेंनी केलेला प्रयत्न फोल ठरला. राजकीय विजनवास त्यांनी अनेक वर्ष भोगला.महाराष्ट्रात शिंदे गट शिवसेनेपासून वेगळा होताच पुन्हा शिंदेंकडे बीड साठी योग्य उमेदवार नाही ही अडचण लक्षात घेता नवलेंनी आपल बस्तान बसवण्यासाठी कंबर कसली. आपली राजकीय जमीन नीटनेटकी करण्यासाठी आरोपांचा आधार घेण्याची वेळ आली. सोनियाशी घरोबा केला अशी टीका त्यांना करता आली नाही. शेवटी त्यांनी उद्धव ठाकरे हे 1996 मध्येच मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करत होते असा गौप्यस्फोट करत राजकीय चर्चेला उधाण आणले. मग सुरेश नवले काँग्रेसमध्ये राहिले राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहिले मग त्यावेळी त्यांनी हे जाहीर का केलं नाही हा प्रश्न सहाजिकच जनतेला पडू लागला आहे.आता शिंदे गटाचे व ठाकरे गटाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात ठरणार असले तरी खरी कसोटी ही जनतेच्या न्यायालयातच लागणार आहे. चिखल फेक करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे. हे साधं गणित न समजण्याइतकी जनता दूध खुळी निश्चितच नाही.जनतेची कितीही दिशाभूल केली तरी सर्वसामान्य माणूस या सर्व राजकीय घडामोडीकडे अतिशय सजगतेने पाहत आहे. याच जागृकतेतून जनता जनार्दन न्याय भूमिका घेऊन प्रत्येकाला आपली जागा दाखवून देणार आहे.पण नवलें नी गौप्यस्फोट केला असला तरी जनता याकडे साशंकतेने पाहत आहे. सव्वीस वर्ष ते गप्प का राहिले? आजच हा गौप्यस्फोट का करावा वाटला? या सर्व प्रकारातून जनता पुन्हा नवलेंना स्वीकारील काय? अशा प्रकारातून पूर्वीचे दिवस नवलेंना प्राप्त होतील काय? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारले जाऊ लागले आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button