महाराष्ट्र

अकाल मृत्यू हारिणी देवी शुभंकरी. Premature Death Harini Devi Shubhankari

रविवार, ०२ ऑक्टोबर २०२२ रोजी नवरात्रातील सातवी माळ असून, दुर्गा देवीचे सातवे स्वरुप असलेल्या कालरात्रि देवीचे पूजन केले जाते.
देवीचे स्वरूप
देवीचे स्वरुप नावाप्रमाणे कालरात्रि आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्ग, तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गर्दभ आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्रि देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत. देवीची दृष्टी वीजेप्रमाणे चकाकणारी आहे.

कालरात्रि देवीचे पूजन

कालरात्रि देवीला कालीमातेचे स्वरुपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालीमातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. तिन्हीसांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे विधान आहे. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षता यांनी देवीचे पूजन करावे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा, असे सांगितले जाते.

कालरात्रि देवीचा मंत्र

दुर्गा देवीच्या कालरात्रि स्वरुपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती, यथासंभव मंत्र जप करावा, असे सांगितले जाते.

‘ऊं ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:।’
एकवेणी जपाकर्णपूरा नग्ना खरास्थिता, लम्बोष्टी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।
वामपादोल्ल सल्लोहलता कण्टक भूषणा, वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भयङ्करी॥

कालरात्रि देवीची महती, महात्म्य

देवी भागवत पुराणानुसार, कालरात्रि देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्णत्वास जातात. तसेच भाविकांच्या समस्या, अडचणी, कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पुराणातील काही उल्लेखांनुसार, कालरात्रि देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानले गेले आहे. त्यामुळे तंत्र-मंत्राचे साधक कालरात्रि देवीचे विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्रि देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्रि देवीला शुभंकरी असेही म्हटले जाते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button