आपला जिल्हा

बीडमध्ये पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले

बीडजिल्ह्यातून 130 जणांचे स्वॅब काल बुधवारी पाठवण्यात आली होती त्यापैकी 27 जणांचे अहवाल प्रलंबित होते. हे अहवाल आज दुपारी प्राप्त झाले असून 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर दोन जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले. 
बीड शहरातील दशरथ नगर मध्ये सापडलेल्या कोरोना पॉझिटिव रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात आलेल्या 54 जणांचे स्वॅब तपासणीसाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले होते त्यातील 3 जण बुधवारी मध्यरात्री आलेल्या अहवालात आढळून आले होते. या अहवाला पैकी 27 अहवाल प्रलंबित होते ते आज दुपारी प्राप्त झाले. यात 25 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर दोन जन पॉझिटिव आढळून आले. आज आढळून आलेले दोन रुग्ण शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close