अल्पवयीन मुलीचा मैत्रिणीच्या बापाकडून विनयभंग. A minor girl was molested by her girl friend’s father

अंबाजोगाई — मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा मैत्रिणीच्या वडिलांनीच विनयभंग केल्याची घटना घडली. दरम्यान या घटनेचा मनावर परिणाम झालेल्या पीडीतेने झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दीपक शरणाप्पा बाबजे रा.अंबिका सोसायटी अंबाजोगाई यांची मुलगी ही पिडीत मुलीची मैत्रीण आहे. 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सहा च्या सुमारास अल्पवयीन पिडीता मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. दरम्यान आजूबाजूला कोणी नसल्याचं लक्षात येताच दीपक बाबजे यांने मुलीच्या मैत्रिणीचाच विनयभंग केला. यावेळी पीडिता जोरात ओरडल्यामुळे दीपक बाबजे हा बाजूला सरकला. ओरडण्याचा आवाज ऐकून दीपक बाबजे ची मुलगी धावत आली. या घटनेने घाबरलेली पिडीता तेथून आपल्या घरी निघून आली. मात्र भीतीपोटी घडलेला प्रकार पीडितेने कोणाला सांगितलं नाही. या घटनेचा पीडीतेच्या मनावर परिणाम झाला तिने 24 सप्टेंबर रोजी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या ही बाब लक्षात येतात तिच्या आईने तिला उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल केले. अति दक्षता विभागात उपचार घेतल्यानंतर पीडित मुलगी 30 सप्टेंबर रोजी शुद्धीत आली. घडलेल्या प्रकाराबाबत आईने विश्वासात घेतल्यानंतर मुलीने सर्व हकीगत सांगितली. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात दीपक शरणाप्पा बाबजे याच्या विरोधात शनिवार दि. एक ऑक्टोबर रोजी पाॅक्सोसह विनयभंगाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुचिता शिंगाडे करत आहेत.