ताज्या घडामोडी

नगर आष्टी डेमू रेल्वे ठरतेय पांढरा हत्ती! खर्च चार लाखाचा उत्पन्न 160 रुपये. Nagar Ashti Demu Railway is becoming a white elephant! Expenditure Rs.4 Lakh Income Rs.160

बीड — नगर बीड परळी रेल्वे मार्ग व्हावा हे स्वप्न बीडकरांनी नेहमीच पाहिलं. रेल्वेमुळे बीडच राजकारणही अनेक वेळा तापलं अनेकांनी राजकीय पोळी भाजली. हे स्वप्न आता पूर्ण झालं अशा अविर्भावी थाटात आष्टी नगर डेमू रेल्वेचं उद्घाटन झालं.मात्र या रेल्वेने दररोज चारच प्रवासी प्रवास करत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. चाळीस रुपये तिकीट दराने 160 रुपये रेल्वेला उत्पादन होत आहे तर रेल्वेच्या एका फेरीसाठी तब्बल चार लाख रुपये खर्च होत असल्याचं उघडकीस आल आहे. त्यामुळे हि डेमू रेल्वे पांढरा हत्ती ठरत असल्याची भीती व्यक्त केली जाऊ लागली आहे.
. नगर – बीड – परळी रेल्वे मार्गाचा प्रकल्प
मार्च 2023 पर्यंत पुर्ण करायचे निर्देश आसतांना देखील अजून भुसंपादन प्रक्रियाच शिल्लक आहे.फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन असले उद्धघाटनाचा उपद्व्याप करण्यात आला अर्धवट कामाचे उद्घाटन कोणी करते का? जनतेला कुठपर्यंत फसवणार? असा प्रश्न उपस्थित करत. विद्यार्थी युवा रेल्वे कृती समीती बीड च्या वतीने समीती अध्यक्ष जयप्रकाश अघाव,उपाध्यक्ष अॅड.गणेश करांडे,सचिव संगमेश्वर आंधळकर,राजेश शिंदे,रुद्रा शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत डेमू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डेमू रेल्वेचे उद्घाटन केले जात असल्याचा जाहीर निषेध केला होता.तसेच नगर आष्टी रेल्वे शटल सेवा पांढरा हत्ती ठरणार असून थोड्याच दिवसात नुकसानीची आकडेवारी मांडून ही शटल सेवा बंद करण्यात येईल तोपर्यंत राजकारणी आपली पोळी भाजून घेतील अशी प्रतिक्रिया विद्यार्थी युवा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष जयप्रकाश आघाव यांनी “सह्याद्री माझा “शी बोलताना दिली होती. आता हीच बाब सत्यात उतरत असल्याचं पाहायला मिळू लागला आहे.
नगर आष्टी शटल रेल्वे सेवा सुरू होऊन आठ दिवसाचा कालावधी होत नाही तोच रेल्वेच्या जमा खर्चाची धक्कादायक आकडेवारी उघडकीस आली आहे. सातशे प्रवासी क्षमता असलेल्या या रेल्वेतून दररोज तीन ते चार प्रवासीच प्रवास करत असल्याचं उघडकिस आल आहे. नगरचे जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास भाई मुळे यांनी मराठवाड्याची भाग्यविधाती व बड्या नेत्यांचे बडे स्वप्न अशा जाहिराती आष्टी नगर या रेल्वेच्या होत्या.आष्टी-नगर डेमु रेल्वे विद्वान रेल्वे मंत्रालयाने 23 सप्टेंबरला सुरू केली आहे, तिचे आर्थिक गणित सर्वांचेच डोळे पांढरे करणारे असल्याचं म्हटलं आहे. नगर रेल्वे स्टेशनचे तिकीट बुकिंग सुप्रिटेंडन्ट उमेश यांना भेटून मागील चार दिवसामध्ये नगर-आष्टी व आष्टी- नगर रेल्वेची किती तिकिटे विकली गेली, याची माहिती मिळवली असता धक्कादायक गोष्ट समोर आली व ती म्हणजे मागील सातही दिवस आष्टी-नगर व नगर- आष्टी मिळून रोज तीन किंवा चार तिकिटांपेक्षा जास्त तिकिटे खपलेली नाहीत. या 700 प्रवासी क्षमता असलेल्या गाडीने रोज फक्त तीन किंवा चार लोकांनी प्रवास केला आहे. नगर- आष्टी चे तिकीट 40 रुपये असून रेल्वेला त्यातून दररोज फक्त 160 रुपये व मागील सात दिवसांत अंदाजे 1 हजार 200 रुपये उत्पन्न मिळाले आहेत, असा दावा त्यांनी केला. या संदर्भात “महानगर न्यूज “ने वृत्तही प्रकाशित केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button