देश विदेश

30 टक्के बाधित आपोआप करोनामुक्त -ICMR

नवी दिल्लीइंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) द्वारे करण्यात आलेल्या एका सामुदायिक नॅशनल सीरो सर्व्हेमधून समोर आलेल्या माहितीनुसार, देशात कन्टेन्मेंट झोनमधील 15 ते 30 टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढेच नाही तर या व्यक्ती आपोआप कोणत्याही उपचारांशिवाय ठीक झाल्याचेही समोर आले आहे. या अहवालावरून ही माहिती देण्यात आली आहे.

देशात सतत वाढणाऱ्या करोनाच्या प्रादुर्भावामध्ये “आयसीएमआर’ने हा खुलासा केलेला आहे. “आयसीएमआर ‘च्या रिपोर्टमध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, कोलकत्ता, चेन्नई, सुरत, जयपूर आणि इंदोर यांसारख्या शहरांच्या हॉटस्पॉट आणि कन्टेन्मेंट झोनमधून मिळणाऱ्या आकड्यांच्या हवाल्याने हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

“आयसीएमआर’ने दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी करोनाच्या संसर्गाचा दर अत्यंत जास्त आहे. येथे इतर हॉटस्पॉटच्या तुलनेत 100 पटींनी जास्त संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. हा “आयसीएमआर’द्वारे करण्यात आलेला पहिला नॅशनल वाइड सीरो सर्व्हे आहे. या सर्व्हेच्या प्राथमिक निष्कर्षांच्या आधारावर हा दावा करण्यात आला आहे. हा अहवाल युनियन कॅबिनेट सेक्रेटरी आणि पीएमओलाही पाठवण्यात आले आहे.

“आयसीएमआर’च्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, हा सर्वे रुग्णांकडून घेण्यात आलेल्या रक्तांच्या नमुन्यांमध्ये करोना विषाणूच्या विरोधात तयार होणाऱ्या आयजीजी ऍन्टीबॉडिजचा शोध घेण्यासाठी करण्यात आला होता.

दरम्यान, आयजीजी ऍन्टीबॉडिज रुग्णांच्या शरीरात करोना व्हायरसशी लढण्यासाठी तयार होतात. हे शरीरामध्ये संसर्ग झाल्यानंतर 14 दिवसांनी दिसतात आणि संसर्ग संपल्यानंतरही अनेक महिन्यांपर्यंत रुग्णांच्या रक्तात सीरममध्ये राहतात. हा सीरो सर्व्हे नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोल, डब्ल्यूएचओ इंडिया आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला आहे. यामध्ये देशाच्या 70 जिल्ह्यांमधून जवळपास 24000 नमुने घेण्यात आले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close