धर्माची पुनर्स्थापना, विवाहात येणाऱ्या अडचणी दूर करणारी देवी कात्यायणी. Goddess Katyayani, restorer of religion, remover of problems in marriage

आज शनिवार शारदीय नवरात्री 2022 चा सहावा दिवस आहे. सहाव्या दिवशी देवी कात्यायणीची पूजा म्हणजे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी दुर्गेचे साहवे रूप असलेल्या देवी कात्ययणीची पूजा. तिला चार हात आहेत ज्यात तलवार, ढाल, कमळ आणि त्रिशूळ आहेत. ती सिंहावर स्वार होते. तिचा आवडता रंग राखाडी आहे. भाविक देवीला प्रसाद म्हणून मध अर्पण करून पूजा करतात.
नवदुर्गेचे सहावे रुप देवी कात्यायणी देवीचे स्वरुप — ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.कात्यायणी देवीचे पूजन :दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.
कात्यायणी देवीचा मंत्र :”
कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां। स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥”
कात्यायणी देवी पूजनाचा लाभ दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायणी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. एका कथेनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायणी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायणी देवीचे पूजन केले होते, असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात.